Tiger Attack Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Tiger Attack Video: सेल्फी काढायला गेला, वाघाने हल्ला केला; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Indian Man Attacked By Tiger: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत एका व्यक्तीवर चक्क वाघाने हल्ला केलेला आहे. नक्की काय घडले आणि कसे घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Indian Man Tiger Selfie Attack: थायलंडमधील एका लोकप्रिय पर्यटनस्थळ फुकेत येथील 'टायगर किंगडममध्ये' एक धक्कादायक घटना घडलेली आहे. जिथे एका भारतीय पर्यटकावर वाघाने अचानक झडप घालून हल्ला केला. सर्व थरारक घटना कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

घटना नेमकी घडली तरी कशी?

थायलंडमधील ही घटना घडली तेव्हा संबंधित भारतीय पर्यटक वाघ असलेल्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेला होता. पर्यटक (Tourist) जेव्हा तिथे गेला त्याच्या सोबत जे वाघाची देखभाल करतात तो व्यक्तीही होता. त्यानंतर वाघाच्या अगदी जवळ जाऊन पर्यटक फोटो काढण्यासाठी जातो. पण वाघाने अचानक पर्यटकावर हल्ला केला. ज्या पर्यटकाच्या अंगावर वाघाने हल्ला केला, त्याच्या किंकाळ्या ऐकून तुमचाही थरकाप उडेल.

टायगर किंगडमधील हा व्हिडिओ सध्या एक्सवरील ''Sidharth Shukla'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर सर्व घटना इन्स्टाग्रा, फेसबूक अशा अनेक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर देखील करण्यात येत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळालेले असून हजारो लाईक्स देखील मिळत आहेत.

सध्या हा व्हिडिओ(Shocking Video) जगभर नेटकऱ्यांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं की,''प्राण्यांशी असी मस्ती केली तर अंगलट नक्की येणार'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''खुपच भयानक घटना आहे'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''यानंतर प्रत्येकजण वाघाच्या जराही जवळ जाणार नाही'' अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT