Leopard Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Leopard Viral Video : बापरे! एक नाही तर चक्क दोन बिबटे शिकारीच्या शोधात; जुन्ररमधील थरारक व्हिडिओ समोर

Junnar Leopard Video : सोशल मीडियावर दररोज अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असतात ,त्यात पुन्हा एक थरारक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मानवी वस्तीत दिसण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. मानवी वस्तीत येऊन वाहन चालकांच्या अंगावर जाणे किंवा शेतात गेलेल्या व्यक्तीवर हल्ला करण्याचे प्रमाण देखील मागील काही दिवसांपासून वाढले आहे. अशीच घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. जिथे शेतशिवारातील घरासमोर एक नाही तर तब्बल दोन बिबटे दिसून आले आहे. संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून सध्या संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्तर पुणे (Pune)जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा मानवी वस्तीत बिबट्या दिसून आला आहे. याच जुन्नर जुन्नर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून बिबट्यांची वाढती संख्या दिसून येते यामुळे शेतशिवारात वास्तव्यास असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जु्न्नर तालुक्यात काल बिबट्या रात्रीच्या अंधारात शिकारीच्या शोधात थेट घराजवळ येऊन पाळीव प्राण्यांना शिकारी करण्याचा प्रयत्नात होता.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही(CCTV) फुटेज सध्या र्चेचाचा विषय ठरत असून बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. याआधीही सोशल मीडियावर अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले त्यात तुम्ही दिवसाढवळ्या असो किंवा रात्रीच्या अंधारात शिकारीसाठी बसलेला बिबट्या पाहिला असेल.तर कधी पुण्यातील दिवे घाटात दिवसा प्रवाशांच्या समोरुन जाणारा बिबट्या पाहिला असेल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता,संपूर्ण परिसर गावाकडील असून एका मोकळ्या जागेत काही ट्र्रॅक्टर दिसून येत आहे. संपूर्ण शिवाय एका बाजूला घर दिसून येत आहे. याच घराबाहेर एक लहान आकाराचे शेड दिसून येत आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर याच निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेड बाजूल एक बिबट्या दिसून येत आहे. मात्र व्हिडिओ जसा पुढे जातो तसं एक नाही तर घराबाहेर चक्क दोन बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते. त्यानंतर दोन्हीही बिबट्या शेताच्या बाजूने पळून जातात. सुदैवाने रात्रीच्या वेळी त्याजागी कोणताही व्यक्ती किंवा पाळीव प्राणी नव्हता.

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT