Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : ती ओरडली, किंचाळत राहिली पण मदतीला कोणीही आलं नाही; मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला

15 Dog Attack on Women : तब्बल १५ कुत्र्यांनी एकत्र येत एका महिलेवर हल्ला केला आहे. ही महिला पहाटे ६ च्या सुमारास आपल्या सोसायटीखाली पार्किंग परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. रहदारी नसेल शांतता असेल तेव्हा भटके कुत्रे अचानक एखाद्या व्यक्तीवर हल्ला करतात. अशा घटनांमध्ये आजवर अनेक व्यक्ती जखमी झाल्यात तर काहींचा जीव सुद्धा गेला आहे. अशात ४ दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत महिलेवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला आहे. घटनेचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हैदराबादच्या मणिकोंडामधील चित्रपुरी हिल्स परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत तब्बल १५ कुत्र्यांनी एकत्र येत एका महिलेवर हल्ला केला आहे. ही महिला पहाटे ६ च्या सुमारास आपल्या सोसायटीखाली मॉर्निंग वॉकसाठी आली होती. नेहमीप्रमाणे ती चालू लागली, त्यावेळी ३ ते ४ कुत्रे आधी तिच्याजवळ आले. त्यानंतर बघता बघता अचानक १५ कुत्र्यांनी या महिलेला घेरलं.

कुत्रे तिच्यावर भुंकू लागले आणि तिला चावण्याचा प्रयत्न करू लागले. सकाळची वेळ असल्याने बाहेर कोणीही नव्हते. आपला जीव वाचवण्यासाठी महिला जोरजोरात ओरडू लागली, किंचाळू लागली, मात्र तिचा आवाज लगेचच कुणापर्यंत पोहचला नाही. या परिस्थितीत महिलेने हार मानली नाही. तिने हाताने आणि आजुबाजूला असलेल्या वस्तूंचा वापर करत कुत्र्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र कुत्रे काही तेथून जात नव्हते. शेवटी काही कुत्रे तिला चावण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यावेळी महिलेने या कुत्र्यांना मारण्यासाठी पायतून चप्पल काढली. चप्पल काढल्याचं पाहताच कुत्रे तिच्यापासून दूर पळाले. त्यानंतर ही महिला पुढे चालू लागली तेव्हा ती पाय घसरून पडली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तितक्यात एक व्यक्ती तेथे स्कुटीवरून येत होता. त्याने महिलेला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेतली.

या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने महिलेने हिंमत दाखवल्याने तिला फार इजा झाली नाही. अन्यथा एवढ्या कुत्र्यांच्या तावडीतून वाचणे कठीण आहे. महिलेच्या पतीने आता पालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती

Accident: ६ जिवलग मित्रांचा एकाच दिवशी करुण अंत, देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

Alkaline Water Benefits: अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? कोणी प्यावे आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घ्या फायदे

NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Onion For High Cholesterol: रोज कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणी खाल्ला पाहिजे

SCROLL FOR NEXT