Chocolate Video Saam TV
व्हायरल न्यूज

Chocolate Video: कॅडबरी चॉकलेटमधून निघाल्या आळ्या; VIDEO पोस्ट करत तरुणाने केली तक्रार

Worm Crawling in Chocolate: व्हिडीओ पोस्ट करत त्याने या चॉकलेटचा व्हिडीओ आणि दुकानातील बीलाचा फोटो पोस्ट केला आहे. हैदराबादमधील मेट्रो स्टेशनवरील दुकानातून या तरुणाने हे चॉकलेट खरेदी केलं होतं.

Ruchika Jadhav

Hyderabad Chocolate Viral Video:

सध्या फ्रेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइनचा महिना सुरू आहे. अनेक प्रेमी युगुल या दिवसांत एकमेकांना भेटवस्तूंसह चॉकलेट्स देत असतात. अशात सोशल मीडियावर कॅडबरी चॉकलेटचा एक धक्कदायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कॅडबरीमध्ये आळ्या झाल्याचं दिसत आहे.

व्हिडीओबाबत अधिक माहिती अशी की, रॉबिन झॅकिअस या तरुणाने आपल्या @RobinZaccheus ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने या चॉकलेटचा व्हिडीओ आणि दुकानातील बीलाचा फोटो पोस्ट केला आहे. हैदराबादमधील मेट्रो स्टेशनवरील दुकानातून या तरुणाने हे चॉकलेट खरेदी केलं होतं.

घरी गेल्यावर चॉकलेट खाण्यासाठी उघडलं त्यावेळी त्यामध्ये आळ्या झाल्याचं त्याला दिसलं. त्यामुळे तरुणाने तातडीने याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. दुकानादाराने एक्सपायरी डेट संपलेलं चॉकलेट ठेवलं होतं. नागरिकांच्या आरोग्याशी असं खेळण्यासाठी कोण जबाबदार आहे? असा प्रश्न त्याने यावेळी विचारला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट केल्यात. सदर घटना वाईट असून दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करा आणि भरपाई घ्या, असं म्हटलं आहे. तर अन्य काही नेटकऱ्यांनी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. कॅडबरी कंपनीकडे या बाबत तक्रार केली असंही एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे. ९ फ्रेब्रुवारी रोजी या तरुणाने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT