Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अरेरे..ATV बाईकवरची हौस पडली महागात; एक्सेलेटर फिरवलं अन् उंटालाच खाली पाडलं

Alibag Viral Video: ज्यात समुद्र किनारी ATV गाडी चालवण्याच्या अतिउत्साहात गाडीने थेट उंटाला जोरधार धडक मारली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Accident Viral Video

सुट्ट्या लागताच पर्यटक वर्ग जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. पर्यटन स्थळांपैकी प्रत्येक व्यक्तीचे आवडते ठिकाण हे समुद्र किनारे असतात. मग लागोपाठ सुट्ट्या लागताच पर्यटकांची पावले समुद्र किनारी वळू लागतात. लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वजण आनंद लुटत असतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समुद्र ठिकाणी गेल्यावर अनेक गमतीदार गोष्टी पर्यटक करत असतात त्यात कधी वॉटर स्पोर्ट्स तर कधी घोडा गाडीवर बसण्याचा आनंद लुटत असतात. मात्र आपण अनेकदा समुद्र किनारी पर्यटकांचा अपघाती मृत्यू होतो आणि रंगाचा भंग होतो. अशातच एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय,ज्यात समुद्र किनारी ATV गाडी चालवण्याच्या अतिउत्साहात गाडीने थेट उंटाला जोरधार धडक मारली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, ATVची गाडीवर बसण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील काही व्यक्ती आपल्याला त्या गाडीवर बसलेले दिसत आहे. त्यांच्या सोबत गाडीचा मालक ही होता जो त्यांना व्यवस्थित बसण्यास सांगत आहे.

काही वेळानंतर सर्वजण गाडीवर व्यवस्थित बसेपर्यंत त्यातील एका चिमुकलीने गाडीचे हॅन्डल जोरात फिरवले,ज्यामुळे काही क्षणातच ATV गाडी अनियंत्रित होऊन भरधाव वेगात जाऊन पुढे जाते. गाडीच्या समोर असलेल्या गर्दीत जाऊन समोर असलेल्या उंटला गाडीची जोरधार धडक बसतेउंटासह त्यावर बसलेले दोघे खाली कोसळले. गाडीवर बसलेले दोघे फेकले गेले. यात काहीजण किरकोळ जखमी झाले.

व्हायरल झालेला व्हिडिओ अलिबागच्या समुद्राकिनाऱ्यावरील असून व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म एक्सवरील @saamTVnewseया अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे तसेच अलिबाग समुद्र किनारी ए टिव्ही गाड्यांचे असे अपघात वारंवार होत असतात मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT