Street Food Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : बटर पावभाजीला विसरा, आता गरमागरम बटर कुल्फी पाववर मारा ताव...; VIDEO व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक खाद्यपदार्थांचे व्हिडिओ असतात. फूड व्लॉगर अनेक स्ट्रीट फूडचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. असाच एक बटर कुल्फी पाव या पदार्थाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Street Food Butter Kulfi Pav Viral:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात अनेक व्हिडिओ हे खाद्यपदार्थांचे असतात. अनेक फूड व्लॉगर स्ट्रीट फूड स्टॉलवर जाऊन व्हिडिओ बनवतात. यात विविध पदार्थांचे व्हिडिओ असतात. असाच एक बटर कुल्फी पावचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Viral News In Marathi)

सकाळी चहासोबत बटर पाव खायला सर्वांनाच आवडते. मुंबईत बटर पाव खूप फेमस आहे. अनेक लोक या बटर पावमध्ये भाजी घालून खातात तर काहींना बटर पाव आवडतो. परंतु तुम्ही कधी बटर पावमध्ये कुल्फी खाल्ली आहे का? नसेलच. परंतु गुजरातमधील एका स्टॉलवर बटर कुल्फी पाव अशी डिश आहे. याचाच व्हिडिओ एकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडिओत एक स्ट्रीट फूड स्टॉल चालवणारा व्यक्ती दिसत आहे. त्याने सर्वप्रथम एका मोठ्या तव्यावर पावाला बटर लावून घेतले. त्यानंतर त्या बटरपावमध्ये आइस्क्रिम टाकल्याचे दिसत आहे. कुल्फीचा एक मोठा तुकडा या बटर पावमध्ये घालून ही डिश ग्राहकांना देताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील आहे.

Mohammed Futurewala या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव हो आहे. लोक काय करतील याचा भरवसा नाही. बटर पाव भजीनंतर आता बटर पाव कुल्फी अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT