Saam Tv
व्हायरल न्यूज

पावसाचा हाहाकार! पुराचं पाणी शाळकरी मुलांच्या कमरेपर्यंत, प्राण गळ्याशी आणणारा व्हिडिओ

School children stuck in flood water: सोशल मीडियावर सध्या एक शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहे. जिथे सर्व विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली आहेत. नक्की हा व्हिडिओ कुठला आहे तो एकदा पाहा.

Tanvi Pol

Gujarat Flood Video: गुजरात राज्यावर पावसाचं संकट कोसळलं असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. ज्यामध्ये सर्वाधिक फटका बसलेला जिल्हा म्हणजे भावनगर. विशेषत म्हणजे महुवा तालुक्यातील तलगाजरडा गावात एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. जिथे शाळेतील लहान मुलं कंबरभर पाण्यात शाळेत अडकलेली दिसून आली आहेत. संपूर्ण गावात पाण्याने हाहाकार माजवला असून अनेक घरं पाण्यात बुडालेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे.

गेल्या २४ तासांपासून गुजरातमधील अनेक भागांत मुसळधार पाऊस(Rain) पडत आहे. भावनगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाने पूरपरिस्थिती निर्माण केली आहे असून महुवा तालुक्यातील तलगाजरडा गावात तर चांगलाच गोंधळ उडालेला आहे. गावातील सर्व रस्ते, शाळा, घरं, दुकाने सगळं काही पाण्याखाली गेलं आहे. धक्कादायक म्हणजे मुलांना शाळेत जाताना कंबरभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

पुराच्या पाण्यात अडकले शाळकरी विद्यार्थी

एका व्हिडिओमध्ये काही लहान मुले शाळेतच पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी यावर संताप व्यक्त केला असून प्रशासनाने शाळा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

सध्या सर्व प्रकार समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल(Viral) झालेला आहे. हा व्हिडिओ राज्यभरात नागरिकांनी पाहिला असून त्यावर विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''शाळा का सुरु ठेवल्या असतील'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खरंच या पावसात मुलांची काळजी खुप घेतली पाहिजे'' तर काहींनी शाळे विरोद्धात संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT