Groom Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Groom Viral Video: नवरदेवाचा अनोखा स्वॅग! गळ्यात घातला २० लाख नोटांचा हार; वरातीचा VIDEO जोरदार व्हायरल

Rs 20 Lakh Currency Note Garland: एका वराने चक्क २० लाखांची वरमाला घातली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Wedding Viral Video:

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नाचे किंवा नवरा नवरीचे व्हिडीओ जास्त प्रमाणात असतात. कधी संगीत, लग्न तर कधी हळद समारंभाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकजण लग्नात काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्न करतात. कधी नवरी-नवरा एन्ट्रीला डान्स करतात तर कधी एकमेकासाठी गाणं म्हणतात. लग्नात खूप जास्त पैसा खर्च करतात. परंतु कधी तुम्ही नवऱ्याने गळ्यात वरमालाऐवजी पैशांची माळ घातलेली पाहिलंय का? असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. एका वराने चक्क २० लाखांची वरमाला घातली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नात वर अगदी चांगला दिसावा यासाठी मेहंदी आणि मेकअपपासून बराच खटाटोप केला जातो. नवरीच्या घरचे लोक नवऱ्याचा खूप जास्त मानपान करतात. अशात आपण किती वरचढ आहोत तसेच लग्नात सर्वांनी आपल्यालाच पहावे यासाठी एका वराने चक्क २० लाखांची वरमाला घातली आहे. याचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नात एक नवरदेवाने चक्क २० लाख रुपयांच्या नोटा चिटकवलेली माळ घातली आहे. या माळेचं वैशिष्ट म्हणजे या माळेची उंची तीन मजली इमारती एवढी आहे. व्हिडीओत नवरदेव घराच्या छतावर उभा आहे. ती माळ त्याने गळ्यात घातलेली दिसत आहे. अगदी खालच्या मजल्यापर्यंत ही माळ पसरलेली दिसतेय. या माळेत ५०० रुपयांच्या नोटा लावण्यात आल्या आहेत.

एका रिपोर्टनुसार, हा व्हायरल व्हिडीओ हरियाणातील कुरेशीपूर गावातील आहे. नवरदेवाच्या या व्हिडीओवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. अनेक युजर्संनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहे. आयकर विभागाला कळवले पाहिजे, एवढ्या नोटा घालून चालायचे कसे? अशा अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी या नोटा खोट्या असल्याचे म्हटले आहे.

आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आणि लोकं काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. नवरदेवाची बाजू फार मोठी आणि श्रीमंतीची असते असा काहींचा समज आहे. त्यामुळे आपण कुणापेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठी या नवरदेवाने भलीमोठी नोटांची माळ घातलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CCTV Video : भावजय नगरसेवक कशी झाली? विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला, बीड पुन्हा हादरले

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सतेज पाटील यांना अल्टीमेटम

Shocking : मुख्यध्यापकांच्या जाचाला कंटाळून १० वीच्या विद्यार्थिनींची आत्महत्या; शाळेच्या आवारात संपवलं जीवन

Punha Ekda Sade Made Teen: नाताळची खास भेट! ‘कुरळे ब्रदर्स’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची तारीख जाहीर

Student Scholarship: या विद्यार्थ्यांना मिळणार १२००० रुपयांची स्कॉलरशिप; काय आहे योजना?

SCROLL FOR NEXT