मगर एक उभयचर प्राणी आहे. ती पाण्यासह जमिनीवर देखील राहते. मगर विविध प्राण्यांसह माणसांनाही फाडून खाल्याच्या काही घटना आजवर समोर आल्यात. अशात मानवी वस्तीत एक मगर शिरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. वस्तीमध्ये मगर आल्याने गावकऱ्यांची मोठी धांदळ उडालीये आणि सर्वांनी दारं खिडक्या बंद केल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१० फुटांची मगर लोकवस्तीत
रत्नागिरीतील खेड तालुक्यात ही घटना घडल्याचं म्हटलं जातंय. @Akshay Mandavkar या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्यावर खाडीनजीक असलेल्या नांदगाव मोहल्ला येथे १० फुटांची मगर लोकवस्तीत फिरताना आढळली. असं कॅप्शनही दिलं आहे.
शिकाराच्या शोधात थेट मानवी वस्तीत
२१ नोव्हेंबर रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहूशकता की, १० फुटांची ही भलीमोठी मगर आहे. मगर संपूर्ण गावात फिरतेय. गावात फिरताना ती शिकाराच्या शोधात थेट मानवी वस्तीत आलीये. येथे ही मगर एका घरात जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.
मगरीला घाबरून घरात पळाले
मात्र गावात मगर आल्याचं समजताच सर्वांनी दारं खिडक्या बंद करून घेतल्यात. एका व्यक्तीच्या अंगणात मगर आल्यावर इतर घरातील व्यक्ती त्यांना पटकन दार बंद करा असं म्हणत आहेत. मगरीच्या तावडीत कोणी सापडलं तर पुन्हा सुटका नाही. अशात पुढे या मगरीचे काय झाले हे समजू शकलेलं नाही.
नांदगाव मोहल्ला या गावाशेजारी एक खाडी आहे. ही मगर (Crocodile) याच खाडीतून आल्याचं म्हटलं जातंय. सध्या सोशल मीडियावर मगरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मानविवस्तीमध्ये हिंस्र प्राण्यांचा वावर आजकाल हमखास पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी नागरिकांनी जंगल तोड केलीये. जंगले तोडून प्राण्यांपासून त्यांचं घर हिरावल्याने ते आता गावांत आणि शहरांत देखील फिरताना दिसतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.