Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बॉलीवूड बीटवर थिरकले वृद्ध जोडपे! आजीं-आजोबांचा डान्स पाहून नेटकरी फिदा

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका वयोरुद्ध जोडप्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकही होत आहे. असे काय आहे ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ कोणत्याही तरुण स्टार किंवा इन्फ्लुएन्सरचा नाही, तर एका वृद्ध जोडप्यांचा आहे. होय, वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. पण वयाला मागे सारत, या जोडप्याने बॉलीवूडच्या गाण्यावर असा डान्स केला आहे की, तो पाहून तरुणाईलाही प्रेरणा मिळेल.

या व्हायरल (Viral) व्हिडिओमध्ये एक वृद्ध आजोबा आणि आजी डान्स करताना दिसतात. दोघेही डान्स करताना उत्साहात आहेत. यांनी पारंपारिक असा पोशाख परिधान केलेला दिसून येत आहे. आजींनी पिवळ्या रंगांची सुंदर साडी नेसलेली आहे आणि आजोबांनी कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. डान्स करताना एक्सप्रेशन्स आणि स्टेप्स अत्यंत सफाईदारपणे केल्या आहेत. डान्स करताना पाहून अनेकांना प्रश्न पडलाय या वयातं यानी खरचं असा डान्स केला आहे.

सोशल मीडियावर ट्रेंडिंग

या व्हिडीओने इतकी प्रसिद्धी मिळवली की,तो फेसबूक, इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील anupama.pamma या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अनेक दिवसांपूर्वीचा असून सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आतापर्यंत याला १ लाखांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

नेटिझन्स म्हणतात, "हेच खरं गोल्स!"

व्हिडिओ (Video) व्हायरल होताच लोकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''अतिशय कमाल डान्स केला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''तरुणांना पाठी सारलं राव यांनी'' तिसऱ्या यूजरने लिहिले,''सुंदर जोडी आहे'' अशा प्रकारे प्रत्येकाने कौतुकास्पदच मतं व्यक्त केली आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Farsan Bhaji Recipe: रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग झणझणीत फरसाणची रस्सा भाजी खाऊन पाहाच

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

SCROLL FOR NEXT