Grandmother Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Grandmother Viral Video: पोरी येडा केलास मला पागल केलास...; शेतात आजीनं गायलं भन्नाट गाणं, VIDEO व्हायरल

Grandmother Video Viral: पोरी येडा केलास, मला पागल केलास तुझ्या नादाने... हे गाणं गायलंय.

Ruchika Jadhav

Viral Video:

गाणं गायला कुणाला आवडत नाही? फार मोठे सिंगर नसले तरी बेकार बेसुर माणसंही कामात किंवा प्रवास करताना गाणं गुणगुणत असतात. प्रत्येकाचा वेगळा काळ असतो आणि आपल्या काळानुसार प्रत्येकाच्या आवडीची गाणीही वेगळी असतात. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल झालाय. आजींनी आपल्या अनोख्या अंदाजात एक कोळी गाणं गायलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजी शेतात काम करत आहेत. शेतीच्या कामात काहीसा विरंगुळा म्हणून तुम्ही पूर्वीच्या बायकांना ओव्या गाताना पाहिलं असेल. अशात या आजींनी ओवी नाही तर थेट एक रोमँटीक गाणं गायलंय. पोरी येडा केलास, मला पागल केलास तुझ्या नादाने... हे गाणं गायलंय.

आगदी ताल सुर लावत आजींनी हे गाणं गायलंय. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. आजींनी गायलेल्या गाण्यामुळे शेतात काम करणाऱ्या इतर महिलांना देखील आनंद होतो. आजींचं गाण ऐकूण एक तरुण तेथे येतो. तो आजींना मोठ्या आवाजात गाणं गायला सांगतो. त्यानंतर आजी जो काही सुर लावतात त्याने व्हिडीओ पुढे पहातच रहावासा वाटतो.

@ᏒᴏʏᴀLKᴏᴋᴀɴɪ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रीया दिल्यात. एका युजरने व्हिडीओत म्हटलंय की, वय तर फक्त आकडाच आहे. आणखी एकाने लिहिलंय की, आजींनी गाणं गाऊन धमाल आणली. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर आजीचं कौतुकहील केलंय.

सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे कोणीही कधीही व्हायरल होतं. काहीतरी युनीक आणि हटके केलं की सर्वत्र या गोष्टीची चर्चा होते. सोशल मीडियावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यांनीही टॉलिवूडमधील श्रीवल्ली हे गाणं गायलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT