Viral claim about Google Pay Pocket Money feature being a scam turns out to be false after fact check. saam tv
व्हायरल न्यूज

Gpay पॉकेट मनी अकाऊंट करेल रिकामं? तुमच्या गुगल पेमध्ये शिरलाय हॅकर?

Fact Check: गुगल पेवरील पॉकेट मनी फीचरमुळे अकाऊंट हॅक होते, असा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. साम टीव्हीच्या पडताळणीत हे फीचर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाणून घ्या संपूर्ण सत्य.

Sandeep Chavan

हा ऑडिओ ऐकलात...तुमच्याकडे जर जी पे असेल तर तुमच्या मोबाईलमध्येही असा पॉकेट मनीचा लोगो दिसेल...आणि या लोगोवर जर तुम्ही क्लीक केलात तर तुमच्या खात्यातील पैसे कट होतील, असा दावा करण्यात आलाय....पण, खरंच हा हॅकिंगचा प्रकार आहे...तुमच्या खात्यातून पैसे काढून घेण्याचा डाव आहे का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...

तुम्ही गुगल पे वापरत असताना काळजी घ्या, कारण तुमच्या अॅपमध्ये पॉकेट मनी नावाचा एक लोगो दिसतोय तो हॅकर्सने पाठवल्याचा दावा केलाय...आणि त्यावर क्लिक केल्यास पैसे कट होतात असा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय...सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय...काहीजण संभ्रमात आहेत...पैसे हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...आम्ही याबाबत अॅपकडून माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहुयात...

गुगल पेवरील पॉकेट मनी फीचर सुरक्षित

पॉकेट मनीवर क्लिक केल्यास अकाऊंट हॅक होत नाही

ग्राहकांसाठीच गुगल पेनं नवीन फीचर दिलंय

हे गुगल पेमधील पॉकेट मनी फीचर काय आहे तेही सांगणं महत्त्वाचं आहे...गुगल पे पॉकेट मनी फीचर काय आहे पाहुयात...?

पॉकेटमनी फीचर काय?

बँक खात्याशिवायही UPI पेमेंट करू शकता

UPI सर्कलमध्ये कुटुंबातील सदस्य, मित्र जोडू शकता

पेमेंट प्राथमिक वापरकर्त्याच्या बँक खात्यातून होतं

प्रत्येक पेमेंट मंजूर करायचे की नाही हे आपण ठरवू शकतो

15 हजारपर्यंतची मासिक मर्यादा सेट करता येते

हे झालं पॉकेट मनी फीचर संदर्भातली माहिती...पण, तुम्ही पॉकेट मनी फीचर कसं सेट करायचं हेदेखील पाहुयात...

पॉकेट मनी फीचर कसे सेट करावे?

1 सर्वप्रथम गुगल पे अॅप उघडा

2 त्यानंतर UPI सर्कलवर जा

3 व्यवहार करणाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर निवडा

4 समोरच्याचा UPI सर्कल QR कोड स्कॅन करा

5 मोबाईल स्क्रीनवर 'प्रत्येक पेमेंट मंजूर करा'

6 जर तुम्ही 'मासिक मर्यादा सेट करा'

सेम मनी लिमिट निवडले, तर तुमच्या आवडीनुसार मासिक मर्यादा सेट करा...त्यानंतर वापरकर्त्याबद्दल अधिक तपशील भरा, तुमचे बँक खाते निवडा आणि Invite वर क्लिक करा...हे केल्यानंतर, पॉकेट मनी फीचर सेट होईल...हे गुगल पेमधील फीचर सुरक्षित आहे...त्यामुळे त्याचा वापर करताना काळजी करण्याची आवश्यकता नाही...ग्राहकांच्या सेवेसाठी हे नवीन फीचर देण्यात आलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत Gpay पॉकेट मनी अकाऊंट रिकामं करेल हा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: उत्पन्नात होणार वाढ, ५ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे खास भविष्य

Maharashtra Live News Update : आंबेडकर जयंतीचा राज्यात उत्साह

IPL 2026: प्रफुल्ल हिंगे आणि हुसैनच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा सुफडासाफ; हैदराबादचा शानदार विजय

Mumbai: मुंबई हादरली! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ड्रग्जच्या ओव्हर डोसने घेतला जीव

होर्मुझमधून जहाजांची वाहतूक पुन्हा ठप्प?अमेरिकेकडून इराणची सागरी नाकेबंदी

SCROLL FOR NEXT