Gmail shutdown saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: गुगल Gmail बंद करणार? तुमचा जीमेलचा डेटा जाणार?

Google Gmail Shutdown Claim Goes Viral: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता गुगल जीमेल बंद करणार असल्याचा दावा करण्यात आलाय... त्यामुळे जीमेलच्या डेट्याचं काय होणार...? जीमेलचा डेटा जाणार का...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...पण, खरंच जीमेल बंद होणार का...? या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

Sandeep Chavan

जीमेल आता बंद होणार असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय...जगभरात जीमेलचे कोट्यवधी युजर्स आहेत...या दाव्यामुळे सगळेच हैराण झालेयत...गुगल अचानक जीमेल बंद का करतंय...? बंद केलं तर जीमेलच्या डेटाचं काय होणार...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...हा कोट्यवधी युजर्सचा जीव्हाळ्याचा विषय आहे...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

जीमेल अधिकृतपणे बंद होत आहे. लोकप्रिय ईमेल सेवा देणारी कंपनी गुगल लवकरच आपले जीमेल अकाऊंट बंद करणार आहे. हा मेसेज वाचून जगभरातील कोट्यवधी युजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय...व्हायरल होत असलेल्या एका स्क्रीनशॉटनुसार, गुगल ऑगस्ट 2024 नंतर जीमेल सेवा कायमची बंद करत आहे...आणि युजर्सना त्यांचे जुने ईमेल आणि अकाऊंट्स डिलीट करावे लागतील, असा दावा केला जातोय. हा मेसेज व्हॉट्सअप आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जातोय...

मूळात, हा सगळा गोंधळ फेब्रुवारी 2024 मध्ये व्हायरल झालेल्या एका जुन्या आणि फेक स्क्रीनशॉटमुळे उडाला आहे. त्या काळात गुगलने त्यांच्या 'Google Workspace' युजर्ससाठी एक नोट पाठवली होती, ज्यामध्ये जीमेल नाही, तर गुगलचे बेसिक सर्च होमपेजच्या जुन्या आवृत्तीमध्ये काही बदल केले जात असल्याचे म्हटलं होतं...तर आमच्या व्हायरल सत्य टीमने अधिक माहिती मिळवली...याबाबत गुगलकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

गूगल जीमेल बंद करणार नाही

जीमेलची सेवा उपलब्ध राहिल

कोणालाही काळजी करण्याची गरज नाही

तुमच्या जीमेल अकाऊंटला कोणताही धोका नाही

स्वतः गुगल कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, जीमेल बंद करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. उलट, गुगल जीमेलमध्ये नवीन फीचर्स आणि सुरक्षा अपडेट्स करत आहे...जगभरात 1.8 अब्जाहून अधिक लोक जीमेल वापरतात. ही सर्वात लोकप्रिय ईमेल प्रणाली देखील आहे. त्यामुळे, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. बरेच लोक जीमेल वापरत असल्याने ते बंद होणार असल्याची बातमी व्हायरल झाली....मात्र, आमच्या पडताळणीत गुगल आता जीमेल बंद करणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...अशा कोणत्याही खोट्या आणि फेसबूक किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि पडताळणी केल्याशिवाय ते पुढे फॉरवर्ड करू नका...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना पोलीस अधीक्षकांची जरांगे पाटलांशी चर्चा सुरू

महाराष्ट्रात 2 कोटी 7 लाख मतदार अपात्र, तुम्ही मतदानाला मुकणार?

काँग्रेस जिल्हाध्यक्षांना मार्शल आर्ट ट्रेनिंग; नाशिकच्या प्रशिक्षणात राहुल गांधींचाही सहभाग

Jalgaon Earthquake: रावेरच्या सातपुडा पर्वत भागात भूकंपाचे धक्के; मोहगण परिसर हादरला, प्रशासन अलर्ट मोडवर

भाजप-शिंदेसेना युती तुटणार? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच पहिली ठिणगी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT