Girlfriend Boyfriend Viral Video  Twitter
व्हायरल न्यूज

Gf-Bf Viral Video: बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवणं पडलं महागात, तरुणीची झाली अशी अवस्था; VIDEO पाहून बसेल धक्का

Girlfriend Boyfriend Viral Video : व्हिडिओमध्ये एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला शॉपिंग कार्टमध्ये बसवू फिरवताना दिसतो.

Priya More

Dont Trust Your Boyfriend Again: सोशल मीडिया (Social Media) हे असे प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी नेहमी काहीना काही नवीन गोष्टी पाहायला मिळत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. यामधील अनेक व्हिडिओ हे खूपच मजेशीर असतात जे आपल्याला पोट धरुन हसायला लावतात.

या व्हिडिओंमध्ये तुम्ही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे अनेक व्हिडिओ पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर अशाच एका कपचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला शॉपिंग कार्टमध्ये बसवू फिरवताना दिसतो. पण पुढे जे काही होते ते पाहून तुम्हाला धक्कासुद्धा बसेल आणि हसायला देखील येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला शॉपिंग कार्टमध्ये बसवतो आणि नंतर या कार्टला पाठीमागून धक्का देत ते रस्त्यावरुन पळवू लागतो. या तरुणाने पायामध्ये स्केटिंग शूज घातले आहे. तो खूपच स्पीडमध्ये हे शॉपिंग कार्ट ढकलताना दिसत आहे. पण पुढे जे काही घडते ते खूपच धक्कादायक आहे याची कल्पना कोणीच करु शकत नाही.

वेगाने रस्त्यावरुन जात असताना अचानक स्पीड ब्रेकर येतो आणि हा तरुण गर्लफ्रेंड बसलेली शॉपिंग कार्टवरील हात सोडून देतो. ही तरुणी कार्टसोबत पुढे जाते आणि जमिनीवर जोरात पडते. या अपघातामध्ये शॉपिंग कार्टचे चाक देखील तुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून या तरुणीला चांगलीच दुखापत झाली असल्याचे दिसत आहे.

@couldgowrongvid नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'शॉपिंग कार्ट.' यासोबतच हसणारा इमोजीही पोस्ट करण्यात आला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, 'माझा दिवस बनवल्याबद्दल धन्यवाद. हे पाहून हसता हसता माझ्या डोळ्यांत अश्रू आले.’आणखी एका युजरने लिहिले आहे, 'आपण सर्वांजवळ एक असा मित्र असतो जो शेवटच्या क्षणी धोका देतो.' या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Dry Skin Care Tips: कोरड्या त्वचेवर लावा फक्त 'या' 3 गोष्टी, चेहरा उजळून निघेल

Ajit Pawar Death: आज ही शेवटची पहाट दादांना भेटायला यायची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ढसाढसा रडल्या; पाहा VIDEO

Panchang Today: जया एकादशीचा शुभ दिवस! विष्णू जपाचा लाभ आणि आजचे शुभ-अशुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT