Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: वा रे वा! सुगरण, लाटता लाटता चपाती फाटली; पोरीने सुई धाग्याने शिवून काढली

Girl Roti Making Video Viral: चपाती लाटताना प्रत्येक मुलीची पहिल्या चपातीबरोबर एक स्टोरी असते. सध्या सोशल मीडियावर एक तरुणी आणि तिची चपाती यांच्यातली एक स्टोरी तुफान व्हायरल झाली आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

मुलगी म्हटल्यावर तिला जेवण बनवता येणं गरजेचं आहे, असं आजही काही अपवाद सोडले तर प्रत्येक कुटुंबात म्हटलं जातं. मुलगी वयात आल्यावर घरी आई तिला आधी चपात्या लाटायला शिकवते. सासरी गेल्यावर त्रास नको म्हणून आधीच शिकून घे असं ही समजावून सांगते. मात्र आजकाच्या मुलींना या सर्व गोष्टी अजिबात आवडत नाहीत. अशात नवीन नवीन चपाती लाटताना प्रत्येक मुलीची पहिल्या चपातीबरोबर एक स्टोरी असते. सध्या सोशल मीडियावर एक तरुणी आणि तिची चपाती यांच्यातली एक स्टोरी तुफान व्हायरल झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर चपातीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या घरी चपाती लाटताना दिसत आहे. आता चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरलं जातं. त्या पिठाला सुक्क पीठ लावून चपाती लाटावी लागते. नाही तर पीठ पोळपाट आणि लाटण्याला चिकटून बसतं. आता या तातडीने चपाती बनवताना सुकं पीठ वापरलं, मात्र तिने चपाती मध्यभागी जास्तच लाटली. त्यामुळे तव्यावर टाकण्यासाठी तिने चपाती उचलली तेव्हा ती मध्येच फाटली.

आता चपातीमध्ये फाटल्यावर ती परत गोल कशी करायची असा प्रश्न तिच्या मनात येतो. त्यामुळे ती आपली शक्कल लढवते आणि सुई धागा घेऊन येते. सुई धाग्याने ती फाटलेली चपाती शिवून काढते. त्यानंतर तव्यावर भाजून गरमागरम चपाती रेडी करते. तरुणीचा चपातीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिचा हा प्रताप पाहून तिची आई तिला कुंकू लावत तिचं औक्षण करते. तसेच तिला एक ट्रॉफी देऊन तिचा सन्मान करते. reenu_chodhary.1 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज आले आहेत. अनेकांनी या कामासाठी तिचं कौतुक केलं आहे. तर एका युजरने अन्न धान्याचा असा खेळ करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

७ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुवेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा; राजकारणात खळबळ

Flat Stomach Tips: कोणताही व्यायाम न करता पोट होईल सपाट! फक्त बदला तुमच्या 'या' सवयी

Maharashtra News Live Update: - सीबीआयकडून लातूर मधील खाजगी क्लास चालकाची तब्बल 9 तास कसून चौकशी

IAS Transfer: 15 सीनियर IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय विभागात मोठा फेरबदल

Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात प्रामाणिक अन् रोमॅंटिक; मनापासून जपतात नाती

SCROLL FOR NEXT