Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : खुर्चीवर स्टंट करायला गेली आणि तोंडावर जोरदार आपटली; व्हिडिओ व्हायरल

Girl Stunt Video : आता या तरुणीने देखील थेट दोन खुर्च्यांवर स्टंट करण्यास सुरूवात केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणी एका खुर्चीवर उभी आहे. या खुर्चीवरून ती दुसऱ्या खुर्चीवर जाते.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video :

सोशल मीडियावर व्हायरल व्हावं असं कुणाला वाटत नाही. आजकाल प्रत्येक व्यक्तीला प्रसिध्दी हवी आहे. तरुणाईलातर सोशल मीडियाचे पुरते वेड लागले आहे. व्हायरल होण्यासाठी तरुण मुलं-मुली अगदी काहीही करतात. स्टंटबाजी करतात. आता देखील सोशल मीडियावर एका तरुणीचा असाच स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र स्टंट करताना तिची चांगलीच फजीची झाली आहे.

डान्स करताना काही आकर्षक स्टेप्स करण्यासाठी मोठी प्रॅक्टीस करावी लागते. प्रॅक्टीस करताना अनेकदा हातापायांना लागतं. आता या तरुणीने देखील थेट दोन खुर्च्यांवर स्टंट करण्यास सुरूवात केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणी एका खुर्चीवर उभी आहे. या खुर्चीवरून ती दुसऱ्या खुर्चीवर जाते.

आपण खुर्चीला टेकून बसतो त्यावर ती पाय ठेवून बॅलेंन्स करत पुढच्या खुर्चीवर जाते. त्यानंतर दुसरी खुर्ची अशाच पद्धतीने जमिनीवर टेकवून तिला खाली उतरायचं असतं. मात्र येथे तिचा तोल जातो. खुर्ची घसरते आणि तरुणी धाडकन तोंडावर आफटते. खाली पडल्यावर तिला फार लागले असावे असं वाटत आहे.

तरुणी खाली पडत असताना तिच्या शेजारी एक मुलगा उभा असल्याचं दिसत आहे. खुर्चीवरून मुलीचा तोल जात असल्याचं तो पाहतो. तो तिला पडण्याआधी सावरण्याचा प्रयत्न करतो. मात्र तितक्यात ती खाली पडते. स्टंटच्या नादात तरुणीने स्वत:ला मोठी दुखापत करून घेतली आहे. हा हस्स्यास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर @kundanmena07 या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओला कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, कॉन्फीडन्स असणे चांगलं आहे, मात्र कॉन्फीडन्स नसावा. यासह या व्हिडिओवर अनेकांनी खळखळून हसतानाचे इमोजी शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस इन्स्पेक्टरचा टोकाचा निर्णय; राहत्या खोलीत आयुष्य संपवलं; कुटुंबियांना वेगळाच संशय

Maratha Protest: मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक; काही समुद्रात उतरले, VIDEO

Venomous Snakes : भारतामध्ये हरणटोळ साप कुठे जास्त आढळतो?

Blast in Firecracker Factory : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात अनेक कुटुंबावर दु:खांचा डोंगर

Jyoti Chandekar: माझ्या डोक्यावरचं छप्पर हरपलं…; आईच्या जन्मदिनी तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

SCROLL FOR NEXT