Dance Vira Video: दिल्ली मेट्रो कायमच चर्चेचा विषय ठरते. प्रत्येक आठवड्यात एक ना एक अतरंगी व्हिडिओ दिल्ली मेट्रोमधून व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी बिंधास्त आणि मनसोक्त नाचताना दिसतेय. (Latest Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल आणि हिट होण्यासाठी सध्या तरुणाईला कसलेही भान राहिलेले नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी फक्त मुलंच नाही तर मुली देखील विचित्र हरकती करत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,एक तरुणी लाल रंगाचा टॉप आणि सुंदर स्कर्ट घालून दिल्ली मेट्रोमधून प्रवास करत आहे.
मेट्रो ट्रेनमध्ये (Metro Train) प्रवास करत असताना ही तरुणी ट्रेन थांबल्यावर नाचायला सुरुवात करते. मेट्रो ट्रेनचे दरवाजे उघडल्यावर एक व्यक्ती समोर फोन घेऊन उभा आहे. तरुणी आधी ट्रेनमध्येच नाचण्यास सुरुवात करते. नंतर नाचता नाचता ती ट्रेनमधून खाली प्लॅटफॉर्मवर येते. इथे नाचत ती काही सेकंदात पुन्हा ट्रेनच्या दरवाजाजवळ धावत जाते आणि नाचू लागते. तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आपण ट्रेन थांबल्यानंतर ती पुन्हा धावण्याआधी जितका वेळ आहे तेवढ्या वेळात देखील रील व्हिडिओ बनवू शकतो असंच काहीसं या मुलीला दाखवायचं आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्यात. यात एकाने लिहिलं आहे की, असा डान्स करण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. तर आणखीन एकाने या तरुणीला उपचारांची गरज असल्याचं म्हटलं आहे.
@ Seemakanojiya या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १५ हजारांहून अधिक लाइक्स आलेत. काहींनी तरुणीचा डान्स पाहून यावर हसण्याचे इमोजी देखील पाठवले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.