Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: वेड्यांचा बाजार! झाडाला दुचाकी बांधून तरुणांनी खेळला झोका; व्हिडीओ पाहून खळखळून हसाल

Funny Video: फळी ऐवजी काही जण येथे घट्ट कापड देखील बांधतात. मात्र या तरुणांनी थेट आपली दुचाकी फळी ऐवजी बांधली आहे. झाडाला भांडलेल्या झोक्यामध्ये त्यांनी आपल्या दुचाकीचा वापर केला आहे.

Ruchika Jadhav

Funny Viral Video:

गावी किंवा एखाद्या गार्डनमध्ये बांधलेला झोका खेळायला सर्वांनाच आवडतं. झोका खेळण्यासाठी वयाचं काही बंधन नाही. हवेमध्ये उंच उंच झोक्यवर झुलण्याचा आनंद तुम्ही सर्वांनी आपल्या लहानपणी नक्की घेतला असेल. आता याच झोक्याचा एक अतरंगी व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणाने झाडाला झोका बांधला आहे. आता झोका म्हणजे एक जाड घट्ट दोरी आणि लाकडी फळी असा काहीसा असतो. किंवा फळी ऐवजी काही जण येथे घट्ट कापड देखील बांधतात. मात्र या तरुणांनी थेट आपली दुचाकी फळी ऐवजी बांधली आहे. झाडाला बांधलेल्या झोक्यामध्ये त्यांनी आपल्या दुचाकीचा वापर केला आहे.

बसण्यासाठी शक्यतो सर्वजण फळी बांधतात. मात्र या तरुणांनी झोक्याला दोन्ही बाजूने दोरी बांधली आहे आणि ही दोरी गावात असलेल्या एका झाडाला लटकवलिये. त्यानंतर दुचाकीवर बसून त्यांनी मस्त झोक्याचा आनंद घेतला आहे. आधीच या दोघांचं वजन आणि त्यात दुचाकीचे वजन यामुळे दोरी तुटून हे दोघेही खाली पडण्याची शक्यता आहे.

तरुणांनी आपला हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. @motor_forte_br या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. झोका घेण्यासाठी यातील समोर असलेला तरुण दुचाकीला रेस देखील देत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत. तसेच अनेक कॉमेडी कमेंट देखील केल्या आहेत. एकाने या तरुणांना खतरों के खिलाडी म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये खरचं या लोकांना डोक नसतं असंही कमेंटमध्ये लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसला हत्तींच्या कळपाची धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

Kolhapur Tourism : पश्चिम घाटातील निसर्गरम्य ऐतिहासिक ठिकाण, हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट

Bollywood Actress : साऊथ चित्रपटात काम करणे कठीण; लोकांनी केल्या शरीरावर कमेंट्स, अभिनेत्री गेली होती ट्रॉमामध्ये

SCROLL FOR NEXT