Fried Stones Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Fried Stones Viral Video: दगडांची चटपटीत डिश खाल्लीये का? पत्ता आणि किंमत्त व्हायरल VIDEO मध्ये पाहा

Fried Stones For Snack: तुम्ही कधी दगडांची भाजी खाल्लीये का? सध्या सोशल मीडियावर दगडांची एक चमचमीत रेसीपी व्हायरल झाली आहे.

Ruchika Jadhav

China Fried Stones Dish Video:

चमचमीत स्ट्रीट फूड चाखायला सर्वांनाच आवडतं. हे स्ट्रीट फूड चाखण्यासाठी खवय्ये बऱ्याच लांब लांब देखील भेट देतात. आतापर्यंत तुम्ही देखील विविध प्रकारचे चमचमीत पदार्थ चाखले असतील. मात्र तुम्ही कधी दगडांची भाजी खाल्लीये का? सध्या सोशल मीडियावर दगडांची एक चमचमीत रेसीपी व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, एका मार्केटमध्ये एक व्यक्ती नदीचे दगड फ्राय करुन विकत आहे. यामध्ये विविध मसाले आणि लसून, कडीपत्ता, टोमॅटो, शिमला मिरची आणि काही भाज्या टाकल्या आहेत.

तेलात आधी दगडं तळून घेतली आहेत. त्यानंतर त्यावर मसाले आणि विविध भाज्या टाकल्यात. ही स्पेशल डिश चायनामध्ये मिळतेय. याची किंमत २०० रुपये इतकी आहे. काही मुली अंगात कॅल्शीअम कमी असल्याने माती खातात. त्यामुळे अशा मुलींना ही डिश जास्त आवडू शकते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दगडांची ही डिश घेण्यासाठी खवय्यांनी मोठी गर्दी केलीये. आवडीने आणि मनसोक्त या दगडांवर काहींनी ताव मारला आहे. या डिशमधील दगड पूर्ण चावून खायचे नाहीत. हे फक्त चोखून खाण्यासाठी आहेत.

दगड चोखून त्याचा मसाला संपल्यावर तुम्ही ते स्वत:कडेच ठेवू शकता. घरामध्ये शोसाठी देखील तुम्ही हे दगड वापरु शकता. @factsmos या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. चायनामधील हा व्हिडीओ आणि रेसीपी पाहून सारेच थक्क झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT