water crisis India  saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ५ दिवस घरात पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन, दुचाकीवरून थेट कार्यलयात, पाहा व्हिडिओ

Water crisis protest: पाच दिवस घरात पाणी नसल्यामुळे संतप्त नागरिकाने अर्धनग्न अवस्थेत स्कुटीवरून थेट कार्यालयात जाऊन आंदोलन केलंय. ही घटना स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उल्हासनगरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनत चालला असून नागरिकांचा संयम आता अक्षरशः संपत आल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या तब्बल पाच दिवसांपासून अनेक भागांमध्ये नळांमधून एक थेंबही पाणी आलेलं नाही. पाण्याच्या टाक्या रिकाम्या पडल्या असल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीये आहे. या पार्श्वभूमीवर एका संतप्त नागरिकाने केलेला हटके निषेध सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

“पाणी नाही तर लाज कशाला?” या भूमिकेतून एका नागरिकाने अर्धनग्न अवस्थेत थेट बाईकवरून पाणीपुरवठा कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील सरकारी हॉस्पिटल पंपिंग स्टेशन परिसरात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असल्याची तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अंघोळ, स्वयंपाक, भांडी, कपडे धुणं यांसारख्या मूलभूत गरजाही भागवणं कठीण झालंय. पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना भटकंती करावी लागत असल्याने संताप वाढलाय.

अशातच याच भागातील रहिवासी राजाराम पवार यांचा संयम अखेर सुटला. “घरात पाणीच नाही, मग कपडे धुवायचे कसे?” असा थेट सवाल करत त्यांनी अर्धनग्न अवस्थेत बाईक सुरू केली आणि थेट उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात धडक दिली. त्यांच्या या कृतीमागे रोष आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. कार्यालयात पोहोचताच उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजेनासं झालं.

पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत, “पाच दिवस पाणी नाही, पण बिल मात्र वेळेवर भरायला सांगता,” असा टोला लगावला. त्यांच्या या अनोख्या निषेधामुळे कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, हा अर्धनग्न अवस्थेत बाईकवरून कार्यालयात पोहोचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. काही जण या निषेधाच्या पद्धतीवर विनोदी कमेंट्स देतायतय तर अनेकांनी पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा प्रभावी मार्ग असल्याचं म्हणत पवार यांना पाठिंबा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT