women theft CCTV viral saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शॉपिंगसाठी ५ जणी एकत्र आल्या, एकीनं दुकानदाराला गप्पा मारण्यात गुंतवलं, चौघींनी साडीत जिन्स लपवून पळवल्या; CCTV व्हायरल

women theft CCTV viral: खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या पाच महिलांनी साडीखाली जीन्स लपवून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ इथल्या चिराग हॉटेलजवळ असलेल्या एका जीन्स कारखान्यात महिलांच्या टोळक्याने तब्बल दहा जीन्स पॅन्टची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना कारखान्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ५ परिसरात असलेल्या या जीन्स कारखान्यात काही ५ महिलांची टोळी खरेदीच्या बहाण्याने कारखान्यात आली होती. सुरुवातीला या महिलांनी अगदी सामान्यांप्रमाणे जीन्स पॅन्ट पाहण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये एक कर्मचारीही दिसून येतोय. यावेळी संधी साधून या महिलांनी एकामागून एक जीन्स पॅन्ट आपल्या लंपास केली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय की, महिलांच्या या टोळीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी केल्याचं पाहायला मिळालं. ५ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मिनिटांतच तब्बल दहा जीन्स पॅन्ट चोरी करून या महिला कारखान्यातून पसार झाल्याची माहिती आहे.

चोरीचा प्रकार लक्षात येताच तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. दिवसाढवळ्या अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येतेय.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT