Fish Viral video Saam TV
व्हायरल न्यूज

Fish Viral video: बापरे! माशाने मुलीला समुद्रात खेचलं; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

Fish Pull Girl In Sea Viral video: सगळ मस्त सुरू असताना अचानक या मुलीला एक मासा पाण्यात खेचतो. मासा मुलीच्या फ्रॉकला पकडतो आणि खाली खेचतो.

Ruchika Jadhav

Fish Pull Girl In Sea:

माणसाच्या आयुष्यात कधी कोणतं संकट येईल काहीच सांगता येत नाही. मात्र आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याची ताकत आपल्यात असलीच पाहिजे. समुद्राच्या मध्यभागी जहाजमधून प्रवास करणं सर्वांनाच आवडतं. मुंबईमध्ये अनेकांना एलिफंटाला जाताना असा प्रवास केलाच असेल. अशात सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ समोर आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माशाने खेचलं पाण्यात

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी मोठ्या जहाजमधून प्रवास करत आहे. जहाजाच्या ग्रीलला धरून ती समुद्रातील पाणी पाहत मस्त प्रवासाचा आनंद घेत आहे. सगळं मस्त सुरू असताना अचानक या मुलीला एक मासा पाण्यात खेचतो. मासा मुलीच्या फ्रॉकला पकडतो आणि खाली खेचतो.

मुलीच्या आजुबाबाजूला बरेच माणसं असतात. मात्र कुणाला काही कळण्याआधीच मुलगी पाण्यात पडते. तिला पडलेलं पाहिल्यावर एक तरुण पटकन पाण्यात उडी घेतो आणि मुलीचा जीव वाचवतो. माशाच्या तावडीतून मुलीची सुटका करून तो तिला पुन्हा जहाजमध्ये आणतो. या घटनेमुळे मुलीसह तेथील सर्वच व्यक्ती भयभीत होतात.

@keepitfit__ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सगळ्यांनी या व्हिडीओवर अश्चर्य व्यक्त करत कमेंट केल्यात. अनेक नेटकऱ्यांनी मुलीचा जीव वाचवलेल्या व्यक्तीचे कैतुक केले आहे.

लहान मुलांना एखाद्या ठिकाणी फिरायला नेल्यावर त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. कारण कधी काय घडेल काही सांगता येत नाही. त्यामुळे पाण्याच्या कोणत्याही ठिकाणी आणि प्राणीसंग्राहलयात देखील लहान मुलांकडे जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

हातात बेड्या अन् प्रचंड राग...पंतप्रधानांच्या घराबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाची दृश्ये, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT