Fire Gun Blast on Bride Face Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात; नवरीचा चेहराच भाजला, पाहा VIDEO

Ruchika Jadhav

सध्या काही लग्नांमध्ये आपल्या पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी नवरी किंवा नवरदेव डान्स करतात. तर काही लग्नांमध्ये फक्त शो ऑफ केलं जातं. दिखावा म्हणून लोकं काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नसतो. हल्लीच्या काही लग्नांमध्ये वधू आणि वर दोघांकडेही हमखास फायरगन पाहायला मिळते. असाच फायरगनचा स्टंट एका नवरीला महागात पडला आहे.

फायर गनमध्ये साध्या बंदूकीतून आग निघत असते. फुलबाजा आणि सुरसुरीप्रमाणे अनेक जण या गनचा वापर करतात. तर आता एका लग्नात फायर गनमुळे नवरीचा चेहराच भाजला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाची लगबग सुरू आहे. नवरी नवरदेव आपला आनंद व्यक्त करत आहेत. पाहुण्यामंडळींनी एकच गर्दी केलीये. आता या सर्वांत इंप्रेशनसाठी वधू आणि वर दोघांच्याही हातात फायर गन दिल्या आहेत. नवरदेव आधी फायर गन उडवतो. त्यानंतर नवरी देखील फायर गन सुरु करते.

काहीवेळ फायर गनमधून आग व्यवस्थित सुरू असते. मात्र काही वेळाने अचानक ही गन फुटते. त्यामुळे आगीसकट गनचा काही भाग नवरीच्या चेहऱ्यावर लागतो. त्यामुळे नवरीचा चेहरा भाजतो. ही संपूर्ण घटना तेथीलच एका व्यक्तीच्या फोनमध्ये कैद करण्यात आली आहे.

@ritik.editsx या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओवर लाखोंच्या घरात देखील लाइक्स आलेत. नवरीचा चेहरा आगीने होरपळतो मात्र तिच्या चेहऱ्यावर त्याच्या काहीच जखमा दिसत नाहीत.

खरंतर या नवरीने खुप जास्त हेवी मेकअप केला आहे. त्यामुळे चेहऱ्यावर फायर गन येऊनसुद्धा तिला दुखापत न झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओवर एका नेटकऱ्याने देखील कमेंटमध्ये मेकअपमुळे वाचली असं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT