Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video : पैठण तालुक्यात बिबट्याचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Viral Video : छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील शेतकऱ्याला सकाळी शेतामध्ये बिबट्या दिसलाय.सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही महिन्यापासून वारंवार बिबट्याचा वावर नागरिकांना पाहायल मिळत होता.मात्र पुन्हा एकदा ७४ जळगाव येथे शेतकऱ्याला सकाळी शेतामध्ये बिबट्या दिसून आलेला आहे.सध्या या घटनेने गावात घबराटीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहान दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ७४ जळगाव येथील शेतकऱ्याला सकाळी शेतामध्ये बिबट्या दिसलाय. याआधीही गेल्या दोन आठवड्यांपूर्वी पैठण तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा होत्या. मात्र त्यात आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ७४ जळगाव येथील शेतकरी अरविंद एरंडे यांच्या शेतात बिबट्या )(Leopardदिसल्याचे त्यांनी स्वतः पाहिले असल्याचे सांगत, त्यांनी थेट बिडकीन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील,बीट जमादार तांगडे,मेजर सुनील कानडे यांना याची माहिती दिली.

बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर या परिसरातील शेतवाडी वस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना नागरिक (citizens)आणि शेतकऱ्यांना दिले. वन विभागाच्या पथकाने ७४ जळगाव परिसरातील शोध मोहीम सुरू केले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ तु्म्हाला शेतशिवाराचा संपूर्ण परिसर (premises)दिसून येत आहे.संपूर्ण व्हिडिओ तेथे असलेल्या एका शेतकऱ्याने लपून आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. व्हिडिओ नीट पाहिले तर दिसेल की,एका शेतातील मोकळ्या परिसरातील झाडाच्या मधून एक बिबट्या पुढे जात असताना दिसून येत आहे.सुदैवाची गोष्ट म्हणजे त्यावेळी शेतात जास्त व्यक्ती उपस्थित नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: बीडचं बिहार होतंय? मित्रानेच मित्राची बोट छाटली

Ladki Bahin Yojana: 42 लाख लाडक्या बहिणी अपात्र,अपात्र लाभार्थ्यांकडून 6800 कोटींची वसुली होणार?

Maharashtra Live News Update: पवईत असमतोल रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात

Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला?मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपी निर्दोष

Pune : परीक्षेसाठी सुट्टी काढून घरी आला, पण काळाने घात केला; पुण्यात २७ वर्षीय जवानाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT