Fake Butter News Google
व्हायरल न्यूज

Fake Butter: नकली बटरने विषबाधेमुळे लिव्हर,किडनीला धोका; काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Fake Butter News: आता बातमी आहे व्हायरल मेसेजची. तुम्ही ((रोज बटर खाता का?) ब्रेडसोबत बटर खात असाल तर तुम्ही आजारी पडाल. कारण, बाजारात नकली बटर विक्रीला आल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं तुम्हीच पाहा.

Sandeep Chavan

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

बटर हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. बटर हे लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच खातात. चपाती, ब्रेड आणि गृहिणी जेवणातही बटरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मुलांना शाळेत घेऊन जायलाही बटर चपाती, बटर ब्रेड दिला जातो.अनेक मुलंही बटर आवडीने खातात. त्यामुळे तुम्ही खात असलेला बटर नकली नाही ना? बाजारात नकली बटर विक्रीला आलेयत.त्यामुळे नकली बटर कसं ओळखायचं? नकली बटर खाण्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.त्यामुळे आम्ही या व्हायरल मेसेजमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

तुम्ही वापरत असलेले बटर नकली असू शकतं. आजकाल बाजारात भेसळयुक्त बटर उपलब्ध आहे.नकली बटर आपण ओळखूही शकत नाही.मात्र, नकली बटर खाल्लं तर लिव्हर, किडनी, हार्टवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.

नकली बटर बनवण्यासाठी ट्रान्स फॅट्स, आयोडीन आणि स्टार्च वापरलं जातं. ट्रान्स फॅट्स म्हणजे कृत्रिम फॅट्स जे उत्पादनासाठी स्वस्त असतात. आयोडीन काहीवेळा रंग आणि पोत वाढवण्यासाठी वापरले जाते.हे जास्त प्रमाणात हानिकारक असते. स्टार्च म्हणजे कोणत्याही पौष्टिक फायद्याशिवाय वजन आणि मात्रा वाढवण्यासाठी जोडले जाते आणि हेच नकली बटर जास्तीत जास्त लहान मुलं खात असतात. मुलांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी भेसळयुक्त बटर घरीच कसं ओळखायचं ते पाहुयात.

नकली बटर कसं ओळखायचं?

दोन काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाका

अर्धा चमचा दोन्ही ग्लासात बटर टाका

बटर टाकलेल्या दोन्ही ग्लासात आयोडीन सोलूशन टाका

आयोडीन सोलूशन हे मेडिकलमध्ये मिळतं

आयोडीन सोलूशन टाकल्यानंतर नकली बटरचा रंग निळा होतो

अशा प्रकारे तुम्ही नकली बटर ओळखू शकता मात्र, नकली बटर तुम्ही खाल्लात तर गंभीर आजार होऊ शकतात. त्याचे काय परिणाम शरीरावर होतात पाहुयात.

व्हायरल सत्य / साम इन्व्हिस्टिगेशन

नकली बटर खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढतं

कोलेस्टेरॉल वाढते, लिव्हर, किडनीला धोका निर्माण होतो

बाजारात सगळेच बटर नकली नाहीये...चांगल्या कंपन्यांचेही बटर अनेक जण ..

डायबिटीस, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो

जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने शरीरातील लठ्ठपणाही वाढतो.

बाजारात सगळेच बटर नकली नाहीये. चांगल्या कंपन्यांचेही बटर अनेकजण आमच्या पडताळणीत बाजारात बटर नकली असल्याचा दावा सत्य ठरलाय. मात्र, काहीजण कंपन्यांचं नाव वापरून भेसळयुक्त असं बटर विकत असतात...त्यामुळे तुम्ही बटर खरेदी करताना सावधगिरी बाळगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT