Viral video of a flooded airport runway sparks confusion – Is it Mumbai or Chennai saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: विमानतळावर पाणी साचलेला व्हिडिओ मुंबईचा की चेन्नईचा; काय आहे व्हायरल सत्य?

Airport Waterlogging Viral Video Fact Check: मुंबई विमानतळावर पाणी असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. विमानाची चाकंही पाण्यात गेलीय. पण, खरंच हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

  • सोशल मीडियावर विमानतळावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल.

  • व्हिडिओ मुंबई विमानतळाचा असल्याचा दावा.

  • पडताळणीत समोर आलं की तो व्हिडिओ चेन्नई विमानतळाचा आहे.

  • अफवांवर विश्वास न ठेवता सत्य पडताळा गरजेचं.

मुंबईला पावसाने झोडपलं असताना विमानतळावर त्सुनामी सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि बघता बघता हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसला. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील असल्याचाच दावा अनेकांनी केला. हा व्हिडिओ पाहा, धावपट्टीवर गुडघाभर पाणी साचलंय. विमानाची चाकं पाण्याखाली गेलीयत.

विमानतळावरील बस, मालवाहू ट्रकही पाण्यात गेलेयत. अख्खं मुंबई विमानतळ पाण्यात गेल्याने विमानसेवा ठप्प झाल्याचा दावा सर्वच वाहिन्यांनी केला. नॅशनल मीडिया, प्रादेशिक वाहिन्यांसह आम्हीही हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील असल्याचं दाखवलं. मात्र, हा व्हिडिओ खरंच मुंबई विमानतळावरील आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील नसल्याचं समोर आलं.

या व्हिडिओसोबत आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओत मुंबई विमानतळाचं नाव दिसतंय. त्याचीही आम्ही पडताळणी केली असता तो व्हिडिओ मात्र, मुंबईतील असल्याची माहिती मिळाली. मग व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला आहे? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

व्हायरल व्हिडिओ मुंबई विमानतळावरील नाही

हा व्हिडिओ चेन्नई इंटरनॅशनल एअऱपोर्टवरचा आहे

4 डिसेंबर 2023 सालातला चेन्नईतील व्हिडिओ आहे

चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर पाणी भरलेलं त्यावेळेचा आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे हा जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. जवळजवळ सर्वच वाहिन्यांनी हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील असल्याचा दाखवला. मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची सत्यता समोर आणल्यानंतर व्हायरल झालेला आणि वृत्तवाहिन्यांवर दिसलेला व्हिडिओ असत्य असल्याचं स्पष्ट झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम करणार भाजपमध्ये प्रवेश...

Lenyadri Caves History: वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा, जुन्नरमधील लेण्याद्री लेण्यांचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

High Blood Pressure : हाय ब्लडप्रेशर असणाऱ्यांसाठी गरम पाण्याची अंघोळ ठरू शकते जीवघेणी!

Social Media: सोशल मीडियाचा वापर असाही होतो, जीवनात घडवतो सकारात्मक बदल

SCROLL FOR NEXT