Viral message claiming ₹6,300 monthly aid for Maharashtra women found misleading; the announcement belongs to Haryana’s Ladli scheme. Saam Tv
व्हायरल न्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीला आता महिन्याला 6300 रुपये? सरकार लाडक्या बहिणांचा हफ्ता वाढवणार?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही सत्यता पडताळून सांगतो...तुमची दिशाभूल होऊ नये म्हणून आम्ही शहानिशा करून तुमच्यासमोर सत्यता आणतो...आताही राज्यातील लाडकींना 6,300 रुपये हप्ता मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच सरकारने अशी घोषणा केलीय का...? याची आम्ही पडताळणी केली..

Sandeep Chavan

लाडकींना आता 2100 नाही तर थेट 6300 खात्यात जमा होणार आहेत, होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे...खरंच सरकारने आता हप्ता वाढवल्याची घोषणा केलीय का...? पैसे वाढवणार असल्याचं सांगण्यात आलंय का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण राज्यात दीड कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आहेत...पैसे वाढणार असतील तर याचा फायदा लाडकींना होऊ शकतो...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...कोणत्या राज्यात लाडकींना किती पैसे सरकार देतं हे आधी जाणून घेतलं

कोणत्या राज्यात महिलांना किती पैसे मिळतात?

महाराष्ट्र 1500 रुपये

मध्य प्रदेश 1500 रुपये

दिल्ली 1000 रुपये

कर्नाटक 2000 रुपये

बिहार 10 हजार रुपये

सध्या एवढे पैसे या राज्यांमध्ये महिलांना दिले जातायत...प्रत्येक राज्यातील योजनांची नावं वेगवेगळी आहेत...मात्र, दर महिन्याला हे पैसे मिळतात...पण, 6300 रुपये खरंच सरकार महाराष्ट्रातील महिलांना देणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली

महाराष्ट्रातील लाडकींचा हफ्ता वाढवलेला नाही

राज्यातील लाडकींना महिन्याला 1500 रुपयेच मिळतात

हरियाणातील लाडकींना 6300 रुपये मिळणार आहेत

2100 प्रमाणे 3 महिन्याचे एकत्र 6300 रुपये मिळणार

हरियाणातील मुख्यमंत्री नायब सैनींनी ही घोषणा केली

हरियाणात सात लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय...दुसरा हप्ता जारी करताच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली...लाडो लक्ष्मी योजना अधिक मजबूत करण्यासाठी आता दर महिन्याला 2100 रुपये देण्या ऐवजी, सरकार दर तीन महिन्याला एकाच वेळी 6300 रुपये जमा करेल...रक्कम तीच असेल, पण एकगठ्ठा मिळणार आहे...हे हरियाणात होतंय...मात्र, महाराष्ट्रातील लाडकींना महिन्याला 6300 रुपये मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT