FACT CHECK: NO ₹16000 FOR SIR FORM – VIRAL CLAIM EXPOSED saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Sir 2026 16000 Rupees Viral Claim Fact Check: SIR 2026 अंतर्गत फॉर्म भरल्यावर १६ हजार रुपये मिळणार असल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, ही फक्त मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आहे, याचा कोणत्याही आर्थिक लाभाशी संबंध नाही.

Omkar Sonawane

सध्या देशासह राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR 2026 प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत मतदारांची माहिती पडताळून अद्ययावत केली जाते. फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यामुळे अनेक नागरिक अर्ज भरताना दिसत आहेत. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा केला जातोय की, SIR अंतर्गत अर्ज भरल्यास 16 हजार रुपये मिळणार आहेत.

हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, SIR चा फॉर्म भरल्यास 16 हजार रुपये मिळणार आहे, असा मेसेज व्हायरल करण्यात आलाय. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ही भारत निवडणूक आयोगाची एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. यामध्ये मतदार यादीतील नावे तपासणे, दुरुस्त करणे आणि अद्ययावत करणे हे उद्दिष्ट असते. या प्रक्रियेचा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लाभाशी काहीही संबंध नाही. म्हणजेच, SIR अंतर्गत फॉर्म भरल्यावर 16 हजार रुपये मिळतात, हा दावा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. याबाबत राज्य सरकारचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय कार्यालयाने दिली आहे.

SIR प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

राज्यातील SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे, यासाठी शेवटची मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व प्रक्रियेनंतर महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT