Aadhaar Card Free Bike Viral Claim – Fact Check Reveals Modi’s Speech Was AI-Generated and Fake. Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना? काय आहे सत्य?

Fact Check: तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर तुम्हाला फ्री बाईक मिळणार आहे...केंद्र सरकारची अशी योजना असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच केंद्र सरकारची अशी कोणती योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

थेट मोदींनीच फ्री बाईकची घोषणा केल्याचा दावा करणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...या व्हिडिओत मोदी म्हणतायत ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे आणि ज्यांच्या घरी सरकारी नोकरी करणारा नाहीये, त्यांना फ्री बाईक दिली जाणार आहेत...फ्री बाईकची घोषणा केल्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होतोय...पण, खरंच आधारकार्ड धारकांना फ्री बाईक मिळणार आहे का...

थेट मोदींचाच व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना हे खरं वाटू लागलंय...काहींनी तर असे प्रश्न विचारलेयत की आमच्या घरी सरकारी नोकरदार नाही...मग आधारकार्ड असलेल्यांनी कशी फ्री बाईक मिळवायची...? हा प्रश्न अनेकांना पडलाय त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, मोदींनीच अशी घोषणा केली असेल तर ही घोषणा कधी केली...मोदींचं हे भाषण कधीचं आहे...? आणि फ्री बाईक मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं लागेल..

याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली...याबाबत अधिक माहिती आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली...मात्र, फ्री बाईक योजनेची घोषणा मोदींनी केली नसल्याचं सांगितलं...मग हा व्हिडिओ आला कुठून...? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना नाही

आधारकार्ड असलेल्यांना फ्री बाईक मिळणार नाही

मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ AI निर्मित

लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही...काही जण लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ बनवतात आणि व्हायरल करतात...आणि काहींना हे खरं वाटतं...त्यामुळे सत्यता जाणून घेतल्याशिवाय असे व्हिडिओ पुढे पाठवू नका...कारण, यामुळे कुणाचीही फसवणूक होऊ शकते...आमच्या पडताळणीत आधारकार्ड असलेल्यांना फ्री बाईक मिळणार हा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT