children produce factory Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : मुलांना जन्म देणारी फॅक्टरी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

children produce factory : आता मुलंही फॅक्टरी बनू शकतात...होय, असा दावा करणारा व्हिडिओ आता समोर आलाय...पण, खरंच मुलं फॅक्टरीत बनवणं शक्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल...होय, आता मुलांना फॅक्टरीत तयार करता येणाराय असा दावा करण्यात आलाय...बायोटेक्नॉलीजिस्ट हाशेम अल-घाइली यांनी हा दावा केलाय...या टेक्नॉलॉजीतून वर्षाला 30 हजार मुलांना फॅक्टरीतून जन्म देऊ शकतो असा दावा केलाय...एक्टोलाइफ या नावाची एक संकल्पना आहे...त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

या फॅक्टरीच्या माध्यमातून तब्बल वर्षाला 30 हजार मुलांना जन्म देणं शक्य असल्याचा दावा केलाय...इतकंच नव्हे तर आई घरी बसून आपल्या बाळाच्या तब्येतीकडे 24 तास ट्रॅक करून लक्ष ठेवू शकते...बाळाच्या शरीराची वाढ झाल्यावर बाळ पोटात असल्यावर जसं लाथा मारतं त्याचाही अनुभव आई घरी बसून घेऊ शकते...या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होऊ शकतं असा दावा केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय...पण, खरंच हे शक्य आहे का...?

या टेक्नॉलॉजीचा वापर करून बाळांना जन्म घालणं शक्य आहे का...याची आम्ही पडताळणी सुरू केली... याबद्दल तज्ज्ञांकडून माहिती मिळवली... आम्हाला रॉयटर्स आणि यूएसए टुडेद्वारे प्रकाशित लेखांमधूनही अधिक माहिती मिळाली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

बाळाला जन्म घालणारी फॅक्टरी अस्तित्वात नाही

बाळांना फॅक्टरीत जन्माला घालण्याचे तंत्रज्ञान नाही

फॅक्टरीमध्ये बाळं जन्माला येतील हा दावा खोटा

भविष्यात असे प्रयोग करता येतील असा विश्वास

त्यामुळे आमच्या पडताळणीत बाळाला जन्म घालणारी फॅक्टरी असल्याचा दावा असत्य ठरलाय...ही एक आयडिया आहे, मात्र, प्रत्यक्षात ते सध्या शक्य नाही...त्यामुळे असे व्हायरल मेसेज आणि व्हिडिओ पाहून विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची सलग दुसऱ्या दिवशी सहा तासांहून अधिक वेळ चौकशी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ६९ हजार, पेन्शन ३४,४७० रुपये करण्याची मागणी

GK : ‘इडली कॅपिटल’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

Vegetable Prices Hike: सर्वसामान्यांना झटका! सणासुदीत बजेट कोलमडलं, भाजीपाल्यांचे दर पाचपट वाढले

SCROLL FOR NEXT