upi payment Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check: UPI सेवा बंद होणार? डिजिटल पेमेंट करणाऱ्यांचे आता वांदे? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

UPI Ban Rumors Go Viral: UPI आता बंद होणार आहे...होय, तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे...कारण, सोशल मीडियावरून एक दावा करण्यात आलाय...त्यामध्ये म्हटलंय की UPI येत्या 1 एप्रिलपासून बंद होणार आहे...मात्र, खरंच यूपीआय बंद होणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

...डिजिटल पेमेंट हा व्यवहाराचा मोठा पर्याय आहे...

हल्ली लोक चॉकलेट घेण्यापासून ते किराणा माल भरण्यापर्यंत...प्रवासाचं तिकीट ते पैसे ट्रान्सफर अशा छोट्या मोठ्या व्यवहारात यूपीआय पेमेंटचा वापर केला जातोय...त्यामुळे आता सोशल मीडियावर यूपीआय बंद होणार असा दावा केल्याने अनेकांना टेन्शन आलंय...कारण, यूपीआय पेमेंटमुळे खिशात पैसे नसले तरी मोबाईलने काम होतं...आणि आता हे यूपीआय पेमेंट बंद का होणार आहे...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

1 एप्रिल 2025 पासून सर्व बँका UPI बंद करणार आहेत.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या टीमने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवली...त्यावेळी अशी कोणतीही सूचना आढळली नाही...मात्र, एप्रिलपासून सर्व बँकांना एनपीसीआयला महिन्याला रिपोर्ट द्यावा लागेल...यामध्ये यूपीआय आयडी, एक्टिव्ह यूजर्स, महिन्याला केलेलं ट्रांजेक्शनची माहिती द्यावी लागणार आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

UPI सेवा बंद होणार नाही

एनपीसीआयकडून UPI व्यवहारांबाबत नवीन नियम जारी

बँकांना नियमितपणे बंद केलेले मोबाईल नंबर हटवावे लागतील

UPI संदर्भात 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होतील

त्यामुळे आमच्या पडताळणीत 1 एप्रिलपासून UPI सेवा बंद केली जाईल हा दावा असत्य ठरलाय...

यूपीआय बंद करण्याबाबत एनपीसीआयकडून अशी कोणतीही माहिती आलेली नाही...कोणाचीही फसवणूक होऊ नये, व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून खबरदारी घेण्यात आलीय...त्यामुळे व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT