Jamun drought claim Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check: जांभळाचा सडा म्हणजे यंदा दुष्काळ पडणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Jamun drought claim: जांभळांचा खच म्हणजे दुष्काळाची चाहूल असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. या व्हायरल मेसेज मागचे सत्य काय ते घ्या जाणून...

Priya More
  • जांभळाचा सडा म्हणजे दुष्काळ

  • हा दावा दिशाभूल करणारा मेसेज होतोय व्हायरल

  • जांभूळ उत्पादन वाढण्यामागे हवामान कारणीभूत असू शकते

  • कोणताही वैज्ञानिक पुरावा दुष्काळाशी थेट संबंध दाखवत नाही

संदीप चव्हाण, साम टीव्ही

जांभळाचा सडा पडला म्हणजे यंदा दुष्काळ पडणार असल्याचा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर असा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे चिंता वाढलीय. पण, खरंच जांभळांमुळे दुष्काळाचे संकेत मिळतात का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

जांभळांचा खच म्हणजे दुष्काळाची चाहूल असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात जांभळं आलीयत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडणार असल्याचे हे संकेत असल्याचा दावा केलाय. यंदाच्या जांभळाची झाडे फळांनी अक्षरश: लगडलेली दिसतायत. अनेक ठिकाणी जांभळांचे सडे पडल्याचे चित्र आहेत.त्यामुळे खरंच जांभळांमुळे दुष्काळाची चाहूल कळू शकते का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

यंदा मुबलक जांभळं म्हणजे दुष्काळाची चाहूल. यंदा दुष्काळ पडणार असल्याचे हे संकेत. जांभळं अधिक येण्यामागचं कारण म्हणजे अधिक काळ सूर्यप्रकाश आणि वाढलेले तापमान यांचा जांभळाच्या फळधारणेवर सकारात्मक परिणाम होतो असं तज्ज्ञ म्हणतात. अवकाळी पाऊस कमी झाला वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला नाही, तर उत्पादन अधिक होते...पावसाळा लांबल्यास फळधारणेचा कालावधीही वाढू शकतो. असे जांभूळ पिकांच्या अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे आमच्या टीमने आणखी एका अभ्यासकांची भेट घेतली.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात. जांभळाचा सडा म्हणजे दुष्काळाची चाहूल नाही. याला कोणत्याही शास्त्रीय पुराव्याचा आधार नाही. नैसर्गिक योगायोग आणि हवामान बदलाचा परिणाम आहे. जास्त फळं देऊन झाड आपली एनर्जी संपवणार नाही. उलट पानं गाळून तसंच कमी फळं तयार करेल.

हवामानात मोठा बदल होणार असल्याचे संकेत मिळतात. तेव्हा झाडं बचावात्मक मोडमध्ये जाते. स्वत:ला वाचवण्याऐवजी आपली प्रजाती टिकून राहावी म्हणून झाड संपूर्ण ऊर्जा बिया अर्थात फळे तयार करण्यासाठी वापरते. त्यामुळे आमच्या पडताळणीत जांभळांचे सडे म्हणजे दुष्काळाची चाहूल असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT