Fact Check: 2 कोटींच्या नोटांचा पाऊस? 2 लाखांचे केले 2 कोटी?

Viral Cash Rain Video Fact Check 2 Lakh To 2 Crore Scam: नोटांचा पाऊस पडतानाचा व्हिडिओ समोर आलाय...यात दावा करण्यात आलाय की पैशांचा पाऊस पाडून ही व्यक्ती 2 लाखात 2 कोटी करून देते...? पण, खरंच नोटांचा पाऊस पाडणं शक्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..
A viral video claiming ‘cash rain’ and money multiplication exposed as a deceptive trick during fact-check investigation.
A viral video claiming ‘cash rain’ and money multiplication exposed as a deceptive trick during fact-check investigation.saam tv
Published On

ही व्यक्ती पैशांचा पाऊस पाडताना दिसतेय...आपली संपत्ती वाढेल असा दावा या व्यक्तीने केलाय...आणि पैशांचा पाऊस पाडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय...2 लाखात 2 कोटी करून देण्याचं आमिष हा दाखवत असल्याचा दावा केलाय...पण, खरंच पैशांचा पाऊस पाडणं कसं काय शक्य आहे...? ही व्यक्ती नक्की कशा प्रकारे पैसे पाडतेय...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

...यामध्ये ही व्यक्ती एका खोलीमध्ये बसलेली दिसतेय...आणि दोन्ही हात हालवत असताना हवेतून पैसे पडत असल्याचं दिसतंय...या नोटा बघा, याच्यासमोर पैशांचा ढीग दिसतोय...पण, ही व्यक्ती कोण आहे...? 2 लाखांत हा 2 कोटी रुपये कसे काय करून देतोय...? असा कोणता हा चमत्कार करतोय...? हाच सवाल उपस्थित होतोय...याचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना याच्यावर विश्वास बसू लागलाय...पण, याची काय हातचलाखी आहे...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...हा व्हिडिओ नक्की कुठला आहे...? याबाबत आम्ही माहिती मिळवली...तसेच आम्ही अंनिसच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना हा व्हिडिओ दाखवला...यात नक्की काय हातचलाखी आहे हे जाणून घेतलं...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

पैशांचा पाऊस कधीही पडत नाही

पैशांचा पाऊस पडतो ही अंधश्रद्धा

लोकांची दिशाभूल करून पैसे उकळण्याचा डाव

भोंदूंच्या आमिषाला बळू पडू नका

हा भोंदूबाबा छत्तीसगडच्या बिलासपूरमधील असल्याची माहिती मिळतेय...तो हातचलाखी करून पैशांचं आमिष दाखवायचा...अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, हवेमध्ये हात फिरवून पैशांचा पाऊस पडत नसतो...संपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला नाही, यामध्ये अर्धवट सगळं दिसतंय...अशा बाबा बुवांच्या आमिषाला बळी पडू नका...जास्त पैसे मिळवण्याच्या नादात तुमच्याकडील पैसे गमावून बसाल...त्यामुळे आमच्या पडताळणीत 2 कोटींच्या नोटांचा पाऊस पडल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com