आता केंद्र सरकारने बंपर भरती काढल्याचा दावा करण्यात आलाय.यामध्ये 10 वी आणि 12 वी पास झालेल्यांना कायमस्वरुपी सरकारी नोकरी मिळणार असल्याचा दावा केलाय.पण, व्हायरल मेसेजमध्ये केलेला दावा खरा आहे का? खरंच सरकारने एवढी मोठी भरती काढलीय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
दहावी, बारावी पास उमेदवारांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळणार. IRIDO अंतर्गत 6300 पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.कारण, सरकारी नोकरी म्हणजे प्रत्येकाला हवी असते आणि दहावी, बारावी पास अशी अट असल्याने अनेकजण अर्ज करू शकतात.
या मेसेजसोबत एक अर्जही पाठवण्यात आलाय. त्यामुळे खरंच सरकारने 6 हजार 300 पदांची भरती काढलीय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी आम्ही याबाबत सरकारकडून याची माहिती मिळवली. त्यावेळी यामध्ये अशी कोणतीही भरती काढली नसल्याचं कळलं. मग हा मेसेज कुठून आला? यामागचं काय कारण असू शकतं? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने भरती काढलेली नाही.
IRIDO अंतर्गत 6300 पदांसाठीची भरती हा दावा खोटा
तुम्हाला लिंक आली असल्यास माहिती भरू नका
बनावट मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जातेय
लिंक उघडून माहिती टाकल्यास फसवणूक होऊ शकत
बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यासाठी आणि वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी हा बनावट मेसेज व्हायरल करण्यात आलाय.त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आधी चौकशी करा. कुणीही मेसेजसोबत लिंक पाठवली असेल तर लगेच अर्ज भरू नका.तुमची माहिती मिळवून फसवणूक करण्याचा हेतू असू शकतो.त्यामुळे आमच्या पडताळणी सरकारने 10 वी 12 वी पास उमेदवारांना बंपर भरती काढल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.