Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : कारमध्ये शिरला हत्ती; प्रवाशांची उडाली धांदळ, हस्यास्पद व्हिडिओ व्हायरल

Elephant Trunk in Car : व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार रस्त्याने जात आहे. येथून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस घनदाट झाडी दिसत आहे. कार काही अंतरावर गेल्यावर प्रवाशांना एक हत्ती दिसतो.

Ruchika Jadhav

मुंबईसारख्या शहरांमुळे आता प्राण्यांची पशु-पक्षांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शहरातील व्यक्तींना काही साधे पाळीव प्राणी दिसले तरी फार कौतुक वाटते. किवा प्राण्यांना पाहून येथील व्यक्ती घाबरतात. अशात सोशल मीडियावर एक हत्ती आणि कारने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा एक फनी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गावी जाताना बऱ्याच व्यक्तींना जंगल लागतं. जंगलातून वाट काढत पुढे जावं लागतं. वाटेमध्ये हमखास काही हिंस्र प्राणी देखील दिसतात. कधी माकडं तर कधी सिंह आणि वाघ असे प्राणी पाहायला मिळतात. आता असाच एखादा प्राणी तुम्ही ज्या वाहनातून जात आहात त्यामध्येच आला तर?

नक्कीच असं झाल्यास सर्वांच्या काळजात धडकी भरेल. तर व्हायरल व्हिडिओमध्ये देखील अशीच घटना घडली आहे. एक कार समोरून जात असताना एका हत्तीने थेट कारमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडालीये.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार रस्त्याने जात आहे. येथून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूस घनदाट झाडी दिसत आहे. कार काही अंतरावर गेल्यावर प्रवाशांना एक हत्ती दिसतो. हत्ती अगदीच रस्त्याच्या मधोमध असतो. हत्ती पाहून त्याला काही इजा होऊनये म्हणून कार चालक लगेचच कार थांबवतो.

कार थांबवल्यानंतर एका व्यक्तीने कारच्या खिडकीतून एक मक्याचे कनीस बाहेर ठेवले. ते पाहून हत्तीने लगेचच आपल्या सोंडेने कनीस खाऊन घेतलं. या व्यक्तींकडे खाण्यासाठी आहे आणि ते आपल्याला आणखी खाऊ देऊ शकतात, असं हत्तीला वाटलं असावं. त्यामुळे हत्ती थेट कारच्या खिडकीतून आपली सोंड कारमध्ये टाकतो.

काही तरी खाण्यासाठी मिळेल म्हणून तो शोधाशोध करत असतो. मात्र हत्तीला खायला देण्यासाठी या व्यक्तींकडे काहीच नसतं. त्यामुळे हत्ती पिसाळला आणि आपल्याला काही हानी पोहचवली तर, या विचाराने सगळेच त्रस्त होतात. तितक्यात कारमध्ये बसलेल्या एक आजीबाई देवाचे नाव घेऊ लागतात. काही वेळाने हत्ती तेथून बाहेर निघतो आणि कार जाण्याची वाट मोकळी होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT