Elderly Man Dies In Bull Attack CCTV Footage Saamtv
व्हायरल न्यूज

Bull Attack Video: मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांवर बैलाचा हल्ला, जाग्यावरचं गेला जीव; भयानक घटना CCTVत कैद

Gangappa Pujari

Bull Attack Viral CCTV Footage Video:

रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्तरप्रदेशमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये एका वळूने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आजोबांवर हल्ला चढवला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही भयंकर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उत्तरप्रदेश बरेलीमधील (Bairely) सेंट्रल स्टेट कॉलनीत राहणारा अक्षय पांडे हा सिव्हिल लाईन्स येथील पंजाब नॅशनल बँकेत डेप्युटी मॅनेजर आहे. त्यांचे वडील कृष्णानंद पांडे (75) पिलीभीत साखर कारखान्यातील ऊस व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते. पहाटे ते घराबाहेर फिरायला जात असताना घरापासून काही अंतरावर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.

बैलाला पाहताच त्याच्या वडिलांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच बैलाने त्याच्यावर हल्ला केला. बैलाचे शिंग पोटात घुसल्याने ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतरही बैल त्यांच्यावर हल्ला चढवत होता. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV Camera) झाली आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या घटनेनंतर बैलाला पकडण्यासाठी महापालिकेला फोन करण्यात आला, त्यानंतर बैल पकडण्यासाठी महापालिकेचे पथक वाहनासह दाखल झाले. पथकाने बैलाच्या गळ्यात दोरी बांधून वाहनाच्या आत टाकण्याचा प्रयत्न करताच बैल इकडे तिकडे धावू लागला. त्यामुळे गळ्यात दोरी अडकल्याने बैलाचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT