Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कोकाकोला घालून अंडी भुर्जी; विक्रेत्याचा अजीब खाद्य प्रयोग, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video Of Coca Cola Bhurji: रस्त्यावरील एका विक्रेत्याने अशा प्रकारचा खाद्यपदार्थ तयार केला की, तो पाहून खाद्यप्रेमी आश्चर्यचकित झाले. आणखी एक फूड फ्युजन व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर रोज नवनवीन खाद्य प्रयोगांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, आणि आता आणखी एक फूड फ्युजन व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. रस्त्यावरील एका विक्रेत्याने अशा प्रकारचा खाद्यपदार्थ तयार केला की, तो पाहून खाद्यप्रेमी आश्चर्यचकित झाले. व्हिडिओ पाहिल्यावर लोकांना राग तर आला, पण त्याचवेळी प्रश्नही निर्माण झाला की, असे अन्न कोण खातं?

व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये रस्त्यावरील विक्रेत्याचा अजीब खाद्य प्रयोग दिसतो. विक्रेता प्रथम कोका कोलाचा डबा एका गंजलेल्या तळण्याच्या पॅनमध्ये रिकामा करतो. त्यानंतर तो ६-७ अंडी फोडतो आणि त्यात मिरच्या, टोमॅटो, कांदे आणि विविध मसाले घालून ते चांगले मिसळतो. नंतर तव्यावर उंच ज्वाला करून अंड्याची भुर्जी शिजवली जाते.

काही वेळ शिजवून विक्रेता ती तयार भुर्जी ग्राहकाला देतो. या विचित्र प्रयोगाला पाहून सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, ज्यामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. अंड्याची भुर्जी बनवण्याची ही विचित्र पद्धत अनेकांच्या आश्चर्याचा विषय बनली आहे. असे खाद्य प्रयोग अगदी कमी प्रमाणात पाहायला मिळतात.

हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर "NO CONTEXT HUMANS" पेजवरून शेअर करण्यात आला आहे, आणि तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी व्हिडिओवर लाईक्स दिल्या असून, अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, "हे खाण्यापेक्षा विष प्राशन करून जीव देणं चांगलं." तर दुसऱ्याने म्हटलं, "जर कोणी हे खाल्ले, तर ते त्याच्यासाठी शेवटचं जेवण असेल." या प्रतिक्रियांमुळे व्हिडिओला अधिक चर्चेचा विषय मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT