Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: बाळ दिसताच कुत्र्याने घातली झडप; चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईची धडपड, काळजाची धडधड VIDEO

Dog Attack On baby Video Viral: बाळ खाली पडलेलं पाहून कुत्रा पुन्हा त्याच्यावर झडप घालतो. तितक्यात आई आपल्या बाळाला उचलून घेते. मदतीसाठी आरडाओरडा करते.

Ruchika Jadhav

Dog Attack Viral Video:

भटक्या कुत्र्यांपासून आजकाल सर्वच नागरिक त्रस्त आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक व्यक्ती जखमी झाल्यात. रात्रीच्यावेळी रस्त्यावर कोणीही नसताना सर्वत्र कुत्र्यांचंच साम्राज्य असतं. माणसांवर हल्ला करण्यासाठी अनेक कुत्रे मागे लागतात. अशात काळजात धडकी भरवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील घाबरून जाल. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये एक आई आपल्या लहान बाळाला कुशीत घेऊन जात आहे. एका कुत्र्याची नजर या बाळावर पडते. त्यानंतर बाळाचा चावा घेण्यासाठी कुत्रा महिलेच्या मागे धावू लगतो. तिला समजतं की कुत्र्याला आपलं बाळ हवं आहे. त्यामुळे ती बाळाला आणखी वरती धरते आणि कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न करते. मात्र कुत्रा (Dog) काही जाताजात नाही.

हतबल झालेली ही महिला काही वेळाने कुत्र्याशी दोन हात करताकरता खाली कोसळते. बाळ खाली पडलेलं पाहून कुत्रा पुन्हा त्याच्यावर झडप घालतो. तितक्यात आई आपल्या बाळाला उचलून घेते. मदतीसाठी आरडाओरडा करते. त्यावेळी रस्तावरून अनेक वाहने जातात. मात्र कोणीही महिलेच्या मदतीसाठी धावून येत नाही. काही वेळाने तेथून एक व्यक्ती जाऊ लागतो. तो पाहतो की कुत्रा महिलेवर आणि तिच्या बाळावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यानंतर हा व्यक्ती तेथे धावत जातो. तो बाळाला आणि महिलेला वाचवतो. तसेच काठी आणि दगडांच्या सहाय्याने कुत्र्याला पळवून लावतो. जीवन मृत्यूशी सुरू असलेला हा खेळ जवळपास १ मिनीटं सुरू राहतो. या वेळात त्या आईच्या मनाला काय वाटलं असेल याची कोणीही कल्पना सुद्धा करू शकत नाही.

@Deepika Narayan Bhardwaj या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सदर घटनेचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. रस्त्यावर असलेले भटके कुत्रे कोणत्या परिस्थितीत आहेत. ते पिसाळलेले आहेत की बरोबर आहेत, हे समजणं कठीण आहे. त्यामुळे कधीही अशा कुत्र्यांना प्रेमाणे जवळ घेऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT