Viral Satya Saam Tv
व्हायरल न्यूज

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Viral Satya: आता बातमी आहे दारू पिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची...दारू करते सर्वनाश असं म्हणतात...आता हा दावा ऐकूनही तुम्ही हैराण व्हाल...दारूमुळे 6 प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आलाय..

Sandeep Chavan

तुम्ही सतत दारू पित असाल तर सावध व्हा, कारण, दारूमुळे जीवघेण्या कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, असा दावा करण्यात आलाय. कॅन्सर म्हणजे भयानक आजार... कॅन्सरमुळे अनेकांचा मृत्यू झालाय. दारुमुळे 6 प्रकारचा कॅन्सर होत असून, रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचा दावा करण्यात आल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.

व्हायरल मेसेज

या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे की, लोक विकत घेऊन पांढरं विष प्राशन करतायत. दारू प्यायल्याने 6 प्रकारच्या कॅन्सरचा धोका निर्माण होतो. ब्रेन, मान, ब्रेस्ट, अन्ननलिका, कोलोरेक्टल कॅन्सर, लिव्हर आणि पोटाचा कॅन्सरचा धोका वाढतो.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची पडताळणी करणं गरजेचं आहे. अनेक जण सतत दारू पितात. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेयत. त्यातच हा नवा दावा केल्यामुळे अनेकांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे याची खरी माहिती सांगण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले. त्यांना मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. याचबद्दल माहिती देताना डॉ. प्रफुल्ल जटाळे म्हणाले की, सिगारेट आणि दारूमुळे कॅन्सर होऊ शकतो.

व्हायरल सत्य

आमच्या पडताळणीच्या या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं आहे. ज्यानुसार, दारू विषाप्रमाणे शरीरात काम करत असल्याचं समोर आलं आहे. याचबद्दल करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये 75 हजार अमेरिकन लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला. सतत दारू पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरचं प्रमाण अधिक होतं. दारु प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दारूमुळे शरीरात अनेक प्रकारे जीवघेणे आजार होतात.

दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे. दारूमुळे आजार होणं म्हणजे विकतचं दुखणं ओढावून घेण्यासारखंच. त्यामुळे अतिप्रमाणात दारूचं सेवन जीवघेणं ठरू शकतं. आमच्या पडताळणीत दारूमुळे कॅन्सर होतो हा दावा सत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Boss 18: अशनीर ग्रोव्हरची बिग बॅासमध्ये एन्ट्री; सलमान खानने घेतली शाळा,VIDEO व्हायरल

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

Jayant Patil: भरणेसारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करा, जयंत पाटील यांचं मोठं विधान

Maharashtra News Live Updates: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आज नागपुरात रोड शो

SCROLL FOR NEXT