Shruti Vilas Kadam
बदामामध्ये व्हिटॅमिन E, झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मेंदू सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
बदामातील मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट आणि अँटिऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात व हृदयविकाराचा धोका कमी करतात.
व्हिटॅमिन E आणि बायोटिनमुळे त्वचा चमकदार आणि केस मजबूत राहतात. बदाम तेल नियमित लावल्यास नैसर्गिक ग्लो मिळतो.
बदामात फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने ते पोट भरल्यासारखे वाटते आणि अति खाण्याची सवय कमी होते.
बदामातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांना बळकट करतात आणि ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण देतात.
डायबेटीस असणाऱ्यांसाठी बदाम फायदेशीर आहे. त्यातील मॅग्नेशियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
बदामातील व्हिटॅमिन E, अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संसर्गांपासून वाचवतात.