कोणताही सण असला की बाजारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. खरं तर मिठाईशिवाय कोणताही सण किंवा आनंदाचा क्षण पूर्ण वाटत नाही. मात्र हल्लीच्या काळात आपण वारंवार बातम्यांमधून ऐकतो की, अनेक खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. देशी तूप आणि शुद्ध माव्याच्या मिठाईतही भेसळ असल्याच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही सणासुदीच्या काळात बाहेरून मिठाई आणत असाल, तर सावध होण्याची गरज आहे. बाजारातून रसगुल्ले आवडीने खाल्ले जात असतील, तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या आरोग्याबद्दल चिंता वाटू लागेल आणि रसगुल्ले खाण्याआधी तुम्ही शंभर वेळा विचार कराल. व्हिडीओत पॅक डब्यात मिळणाऱ्या मिठाईच्या निर्मितीची अत्यंत किळसवाणी प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. आपण विश्वासाने ही मिठाई घरी आणतो, पण प्रत्यक्षात ती स्वच्छतेच्या कोणत्याही निकषांवर खरी उतरत नाही. या प्रकाराला लोकांच्या आरोग्याशी खेळ म्हणता येईल, कारण त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. व्हिडीओत काही तरुण हातमोजे न वापरता रसगुल्ले भरताना दिसतात, आणि स्वच्छतेचा पूर्ण अभाव स्पष्ट दिसतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे नागरिक प्रचंड संतापले आहेत. हा प्रकार नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
बाजारात फसवणूक होणं आता सामान्य झालं आहे. भेसळयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं हीच आपली अपरिहार्य अवस्था बनली आहे. आज जवळपास सर्वच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 'kharartochd' नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओसोबत तरुणीने कॅप्शन लिहिले आहे, “अजून खा रस्सगुल्ले.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी संताप व्यक्त केला तर काहींनी मजेशीर पद्धतीने टिप्पणी केली. सध्या या व्हिडीओवर चर्चा रंगली असून, लोक आपापले विचार मांडत आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि गोंधळ सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.