Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Pepsi Viral Video: तुम्हाला माहित आहे का लहानपासून खाल्लेली पॅप्सी कशी बनते? पाहा व्हायरल VIDEO

Viral Video: उन्हाळ्यात गारवा देण्यासाठी शीतपेये महत्त्वाची ठरतात. ९० च्या दशकातील मुलांसाठी १ रुपयाची पेप्सी हा उन्हाळ्यातील विशेष आनंद होता, जो स्वादिष्ट आणि परवडणारा पर्याय मानला जात असे.

Dhanshri Shintre

उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी शीतपेये आवश्यक असतात. ९० च्या दशकातील लहान मुलांसाठी '१ रुपयाची पेप्सी' हा उन्हाळ्याचा खास आनंद होता. हे पेय लहान, ट्यूबसारख्या पाउचमध्ये १ रुपयांना मिळतं. त्याची चव गोडसर आणि फ्रुटी फ्लेवर्समुळे खास असते, तसेच ते परवडणारे आहे. अनेकांच्या बालपणाच्या आठवणींशी हे पेय जोडले गेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे पेय कसे बनते? जर नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि '१ रुपयाची पेप्सी' कशी तयार होते ते जाणून घेण्यासाठी नक्की पाहा.

अलिकडेच, फूड व्लॉगर @eatwithdelhi ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात 'पेप्सी आइस पॉप्स' तयार करण्याची प्रक्रिया दाखवली आहे. व्हिडीओमधील एक व्यक्ती मोठ्या ड्रममध्ये भरपूर दूध ओतताना दिसतो. त्यानंतर तो त्यात प्री-मिक्स आणि स्वादयुक्त सिरप टाकून व्यवस्थित मिसळतो.

मात्र, या व्हायरल व्हिडीओ प्रक्रियेतील सर्वात रोचक टप्पा म्हणजे पॅकेजिंग. एक लांब ट्यूब पाईप नळाला जोडलेली असते आणि त्यातून हे मिश्रण वाहते. शेवटी, ट्यूब कापली जाते, सील केली जाते आणि हे पेय रात्रभर गोठवले जाते. एवढे झाले की, बालपणाची आठवण करून देणारे स्वादिष्ट पेप्सी आइस पॉप्स चाखण्यासाठी तयार होतात.

हा व्हिडीओ आतापर्यंत ६ लाख ७४ हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओ अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. एका यूजर्सने लिहिले की, अजूनपर्यंत जिवंत आहे खूप आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, तर माझी आई बरोबर होती... ते सांडपाण्याच्या पाण्यापासून बनवले जाते. तिसऱ्याने लिहिले आज माहित पडलं ते किती हायजिनिक असतं ते. असे अनेक कमेंट्स या व्हिडीओला येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2025: ITR भरल्यानंतर ई-व्हेरिफाय कसे करावे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Maratha Reservation : राणे कुटुंबावर हात टाकण्याची भाषा केली तर...; जरांगेंनी भावावर टीका केल्यानंतर निलेश राणे संतापले

Study Tips: झोपण्यापूर्वी की सकाळी उठल्यानंतर? कोणत्या वेळेत अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते?

Manoj jarange patil protest live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन-जपान दौऱ्यानंतर भारतात पोहोचले

Maratha Reservation: संघर्ष पेटणार! ओबीसीही मुंबईत धडकणार? मनोज जरांगेंच्या उपोषणाला उपोषणाने उत्तर देणार

SCROLL FOR NEXT