Girl stuns the internet with her authentic Lavani steps on the Marathi hit ‘Chaal Majhya Payaat’ Saam Tv
व्हायरल न्यूज

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Girl Dance Viral: चाळ माझ्या पायात पाय माझे तालात या मराठमोळ्या गाण्यावर एका तरुणीने भन्नाट डान्स करत सोशल मीडियावर धूम उडवली आहे. तिची स्टेप्स, डान्स स्टाईल आणि हावभाव पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Tanvi Pol

Viral Dance Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. 'चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालात' या पारंपरिक मराठमोळ्या गाण्यावर एका तरुणीने असा ठसकेबाज नृत्य परफॉर्मन्स केला की, पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत. नेटकऱ्यांनी या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आणि 'हीच खरी मराठमोळी कला' अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पारंपरिक लूक, पारंपरिक ठसा

व्हायरल व्हिडीओमध्ये, दिसणारी ही तरुणी पारंपरिक नऊवारी साडी, गजरा, कुंकू आणि हलकी नथ परिधान करून डान्स(Dance) करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि देहबोलीतला मराठमोळा ठसा लक्ष वेधून घेतो. ती डान्स करत असताना, तिच्या प्रत्येक हालचालीत गाण्याचा ठेका, शब्दांची झुळूक आणि शुद्ध लय दिसते. ही केवळ एक डान्स परफॉर्मन्स नसून, तो एक संस्कृतीचा उत्सव वाटतो.

सोशल मीडियावरचा जल्लोष

हा व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब अशा विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झालाय. लाखो लोकांनी तो पाहिला असून हजारो नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील nehapatil1507 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

डान्स व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच बऱ्याच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''सभ्यता. सुंदरता. संगीताचा आदर. कुठल्याही अंग प्रदर्शन नाही. अप्रतिम ताई'' दुसऱ्या यूजरनं म्हटलं,''यालाच म्हणतात मराठी बाणा'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT