Delhi Viral Video News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

Delhi Viral Video News : दिल्लीतील तीस हजारी कोर्टात ड्युटीवर असताना पोलिस उपनिरीक्षकाचा चालता चालता हार्टअटॅकने मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • दिल्लीतील तीस हजारी कोर्टात पोलिस उपनिरीक्षकाला ड्युटीदरम्यान हार्टअटॅक

  • चालता चालता ते अचानक कोसळले आणि जागीच मृत्यू झाला

  • या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

  • वाढत्या हृदयविकाराच्या घटनांमुळे पोलिसांवर आरोग्य ताणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सध्या हार्टअटॅकचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने हे प्रमाण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. अशीच एक धक्कदायक घटना दिल्ली मधून समोर आली आहे. दिल्लीत ऑन ड्युटी असलेल्या एका पोलिसाचा चालता चालता अचानक हार्टअटॅक येऊन जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील तीस हजारी कोर्टात कर्तव्यावर असताना दिल्ली पोलिसांच्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाचा (एएसआय) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९:२२ च्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक घरी जात होते. ड्युटीवर उपस्थित त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी हात मिळवून गप्पा मारत घरी निघाले. वाटेत त्यांना असह्य जाणवू लागलं.

त्यांनी एस्केलेटरकडे जाऊन मित्राला हात मिळवला. आणि पुढे जाताच त्यांच्या छातीत जोरात दुखू लागलं. म्हणून ते एका ठिकणी उभे राहिले, यादरम्यान ते धाडकन खाली कोसळले. छातीत कळ आल्याने ते खाली पडल्यावर तडफडू लागले. त्यांना खाली पडल्याचं बघताच आजूबाजूची सगळी मंडळी घटनास्थळी जमा झाली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. परिस्थिती पाहून पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सहाय्यक उपनिरीक्षक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या उपनिरीक्षक पोलिसाचा मृत्यू तीव्र हार्टअटॅकने झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या दुर्घटनेने उपनिरीक्षकाच्या कुटुंबीयांनी दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान काही मिनिटांपूर्वी पूर्णपणे सामान्य आणि हसतखेळत असलेला माणूस काही क्षणात मृत्यूच्या दारात उभा राहतो या अशा घटनांनी अंगावर काटा उभा राहतो . तीस हजारी कोर्टातील या घटनेने पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या धावपळीच्या वेळापत्रकावर आणि तणावपूर्ण कर्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT