Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेमात गुलीगत धोका! गर्लफ्रेंडने बायफ्रेंडला रंगेहात पकडलं, मेट्रो स्टेशनवरच प्रेमाचा पंचनामा, पाहा व्हिडीओ

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो स्टेशनवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड खूप जोराजोरात भांडताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हे मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोचे असतात. दिल्ली मेट्रोत तर प्रवासी काही न काही करत असतात.दिल्ली मेट्रोतील प्रेमीयुगुलांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका जोडप्यांमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. त्यांचे हे भांडण इतर प्रवासी सोडवताना दिसत आहे.

दिल्ली मेट्रो स्टेशनवरील हा व्हिडिओ आहे. जिथे कपल खूप जोरात भांडताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांच्यात मारामारीदेखील होताना दिसत आहे. ते दोघे एकमेकांना ढकलताना दिसत आहे.या धक्काबुक्कीमध्ये त्या मुलीला मुलगा जोरात धक्का मारतो आणि ती मुलगी खाली पडते.

@daily_24hour या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे.मीडिया रिपोर्टनुसार, या मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला रंगेहात पकडले आहे. त्यामुळेच त्यांच्यात खूप जोरजोरात भांडणे होताना दिसत आहे. तिचा बॉयफ्रेंड कदाचित दुसऱ्या मुलीसोबत दिसला असेल त्यामुळेच या मुलीला राग अनावर झाला आणि ती बॉयफ्रेंडशी भांडताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.स्ट्रीट शो, दिल्ली मेट्रो आहे की भांडणांचा अड्डा अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत. त्याचसोबत मुलीला ढकलले त्यामुळे अनेकांना संतापदेखील व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, सर्वसामान्याचं टेन्शन वाढलं; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT