Choli Ke Peeche Kya Hai Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Choli Ke Peeche Kya Hai Viral Video: "चोली के पिछे क्या है..." गाण्यावर भन्नाट डान्स; दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Choli ke Peeche Kya Hai In Delhi Metro Viral Video: त्यामुळे दिल्ली मेट्रोमधील आतापर्यंत अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

Ruchika Jadhav

Delhi Metro Train Viral Video: दिल्ली मेट्रो आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेट्रो ट्रेनमध्ये तरुण तरुणी त्यांना हवं तसं नाचतात आणि विविध कारनामे करतात. त्यामुळे दिल्ली मेट्रोमधील आतापर्यंत अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तरुणानाने डोक्यावर ओढणी घेत डान्स केलाय. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, तरुण बॉलिवूडच्या चोली के पिछे क्या है या गाण्यावर नाचत आहे. गाण्यावर तरुणाने चांगलाच ताल धरलाय. नाचताना त्याने डोक्यावर ओढणी घेतलीये. यावेळी ट्रेनमध्ये त्याचे काही मित्र देखील उपस्थित आहेत. ते सर्व मिळून त्याला डान्स करण्यासाठी आणखीन स्टेप्सच्या टीप्स सांगत आहेत.

या तरुणाने देखील भन्नाट स्टेप्स केल्यात. मध्येच तो पोलडान्स देखील करताना दिसतोय. तरुणाचा मित्र त्याला असे विविध डान्स करण्यास सांगत आहेत. एक मित्र मागून ओरडतोय की, भावा बेली डान्स कर तर आणखीन एक मित्र त्याला दुसऱ्या गाण्यावर डान्स कर असं म्हणत आहे.

@DUUpdates या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात. या आधी दिल्ली मेट्रोत एका तरुणीने स्टंटबाजी केली होती. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये ही तरुणी थेट कोलांट्या उड्या मारु लागते. तिला पाहून ट्रेनमधील इतर प्रवाशी देखील चक्रावतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT