Navratri Song In Metro Saam TV
व्हायरल न्यूज

Navratri Song In Metro: दिल्ली मेट्रोतलं कधीही न पाहिलेलं दृश्य...; तरुणांनी गायलं माँ शेरावालिए गाणं, VIDEO VIRAL

Delhi Metro Navratri Song Video Viral: दिल्ली मेट्रोत नवरात्री सेलिब्रेशन; तरुणांनी गायलं माँ शेरावालिए गाणं, आतापर्यंत कधीही न पाहिलेला VIDEO व्हायरल

Ruchika Jadhav

Delhi Metro Viral Video:

दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडीओ हे समिकरण काही नवीन नाही. प्रवाशांच्या सोई सुविधांपेक्षा त्यामधील व्हायरल व्हिडीओमुळेच दिल्ली मेट्रो नेहमी चर्चेत असते. कधी कपलच्या रोमान्समुळे, कधी प्रवाशांच्या फायटिंगमुळे तर कधी रिल्सस्टारच्या डान्समुळे दिल्ली मेट्रो चर्चेत येत असते. यातील व्हिडीओ जोरदार व्हायरल ही होतात. मेट्रो प्रशासनाने असे व्हिडीओ काढणाऱ्यांवर कारवाईही केली,मात्र दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच चालले आहेत. अलीकडेच दिल्ली मेट्रोतील एक वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Latest Marathi News)

सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत त्यामुळं लोकामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. असाच उत्साह दिल्ली मेट्रोतही पाहायला मिळालाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मेट्रोतील काही तरुण भजन गाताना दिसत आहेत. जे पाहून नेटकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिल्ली मेट्रोत काही मुलं एकत्र भजन गाताना दिसत आहेत. 'तूने मुझे बुलाया शेरावालिए' हे भजनाचे स्वर आहेत. या मुलांना गाताना पाहून तिथं उपस्थित असलेले सर्वजण त्यांना साथ देत आहेत. ट्रेनमधील काही व्यक्तींनी ही दृश्य आपल्या मोबाईमध्ये कैद केलीत.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हजारो लोकांनी व्हिडीओ पाहिला असून नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, दिल्ली मेट्रोचा हा खूपच मस्त व्हिडीओ आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओला लोकांनी पसंत केलंय. तसंत मोठ्या प्रमाणात शेअर ही केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT