Delhi Metro viral clash saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रवास मेट्रोचा, राडा मात्र गावरान, मेट्रोतील हाय-व्होल्टेज ड्रामा; हाणामारीचा व्हिडीओ पाहा

Delhi Metro viral clash : दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांमधील मारामारीमुळे मेट्रो सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

दिल्ली मेट्रो ही काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असते. कधी कपल्सचे अश्लील चाळे, कधी भांडणं तर कधी मजेशीर घटना दिल्लीच्या मेट्रोमध्ये घडत असतात. असंच आता दिल्लीच्या मेट्रोतील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीच्या मेट्रोमध्ये झालेली हाणामारी समोर आलीये.

दिल्ली मेट्रोमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल

दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून झालेल्या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तीन प्रवाशांमध्ये सीट मिळवण्यावरून सुरुवात झालेली बाचाबाची पुढे हाणामारीपर्यंत पोहोचल्याचं दिसून येतंय. त्यामुळे मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोचा डबा नेहमीप्रमाणे प्रवाशांनी भरलेला दिसतोय. सुरुवातीला सर्व काही शांत असताना अचानक सीटवरून दोन जणांमध्ये वाद सुरू होतो. काही क्षणांतच हा वाद मारमारीचं रूप घेतो. यावेळी दोन तरूण एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतात. इतर प्रवासी या घटनेकडे पाहत असल्याचेही व्हिडिओत दिसून येतंय. तर काही जण परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @1K_Nazar या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'सीट का संग्राम! दिल्ली मेट्रोमध्ये तुमचं स्वागत आहे'असं कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि कमेंट्स आल्या आहेत.

युजर्सने केल्या विविध कमेंट्स

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही यूजर्सनी मेट्रोतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय़. तर काहींनी प्रवाशांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केलीये. 'मेट्रोमध्ये प्रवास सुरक्षित आहे का?' असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तर काहींनी 'दिल्ली मेट्रोमध्ये अशा घटना आता सामान्य झाल्या आहेत', असं म्हटलंय.

दिल्ली मेट्रोमध्ये यापूर्वीही अशा प्रकारचे वाद, मारहाणीचे प्रसंग आणि चुकीच्या वर्तनाचे व्हिडिओ व्हायरल झालेत. सीटवरून वाद होणं, किरकोळ कारणांवरून भांडण किंवा प्रवाशांमध्ये धक्काबुक्की होणं हे प्रकार अधूनमधून समोर येत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

Kidney Cancer: किडनी कॅन्सरची सुरुवात अनेकदा या 1 लक्षणाने होते; 99% लोकं करतात दुर्लक्ष

VIDEO : सिया गोयलची मुजोरी संपेना, कॅमेऱ्यासमोर अश्लील वर्तन, मिडल फिंगर दाखवलं अन्...

मांड्यांवरील स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय|Thigh Strech Marks Tips

SCROLL FOR NEXT