Daughter Father Love Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Daughter Father Love Video: चिमुकलींनं भातुकलीच्या खेळात बनवलं बाबासाठी पिठलं भाकरी, काळजाला भिडणारा VIDEO व्हायरल

Girl Made Pithle Bhakari For Father: सध्या सोशल मीडियावर एक काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका चिमुकलींनं भातुकलीच्या खेळात तिच्या बाबासाठी पिठलं भाकरी बनवल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

Emotional Video Viral On Social Media

बाप लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका चिमुकलींनं भातुकलीच्या खेळात तिच्या बाबासाठी पिठलं भाकरी (Pithle Bhakari) बनवल्याचं दिसत आहे. तिने पहिल्यांदाच वडिलांसाठी जेवण बनवलं (Daughters Father Video) आहे. सध्या सोशल मीडियावर काळजाला भिडणारा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  (latest viral news)

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक चिमुकली झाडाखाली बसलेल्या तिच्या वडिलांजवळ जाते. तिचे वडिल हातात लॅपटॉप हातात घेऊन काम करत आहे. ती वडिलांना लाडाने विचारते (Daughters Father Love Video) की, काय खाणार? यावर तिचे बाबा तिला 'पिठलं भाकर' असं उत्तर देतात. यानंतर ती स्वत: आपल्या चिमुकल्या हातांनी अतिशय प्रेमाने तिच्या बाबांसाठी स्वयंपाक करते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चिमुकलींनं बनवलं बाबासाठी पिठलं भाकरी

व्हिडिओमध्ये दिसतंय की, झाडाखाली एक तिचं भातुकलीच्या खेळातलं स्वयंपाकघर तिने तयार केललं आहे. यामध्ये दगडांपासून बनवलेली चूल आहे. त्याखाली लाकडांच्या मदतीने तिने (Daughter Father Love) ती चूल पेटविली. त्यावर तिची छोटीसी कढाई ठेवली अन् अतिशय प्रेमानं तिने पिठलं बनवलं. नंतर तिने एका प्लेटमध्ये पीठ घेतलं अन् छोट्या-छोट्या भाकरी बनवल्या आहेत.

भाकरी आणि पिठलं बनवून झाल्यावर ही चिमुकली ताट बनवून तिच्या बाबांकडे घेऊन जाते.वडिलांच्या हातात हे जेवणाचं ताट देते. तिचे बाबा तितक्याच प्रेमाने ते पिठलं भाकरी खातात. तेव्हा चिमुकलीचा आनंद गगनात मावेनासा (Girl Made Pithle Bhakari For Father) नसतो. तिचे वडिल तिला अतिशय प्रेमाने पिठलं भाकरी भरवताना दिसतात.

बापलेकीचे प्रेम दाखवणारा व्हिडीओ

हा व्हिडिओ पाहून थेट डोळ्यात पाणी (viral) येतं. वडिल आणि मुलीच्या नात्यातील प्रेम दाखवणारा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे. खरं तर प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा हिरो असतात. वडिल मुलीच्या हट्टासाठी वाट्टेल ते (viral news) करतात. सोशल मीडियावर बापलेकीचे प्रेम दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

हा व्हिडीओ manishajamdare या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला (viral video) आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, “बाबांसाठी पहिल्यांदा पिठलं भाकरी” असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT