Crocodile Under Road Saam TV
व्हायरल न्यूज

Crocodile Under Road: बापरे बाप! रस्ता फोडून बाहेर निघाल्या भल्या मोठ्या मगरी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Crocodile Viral Video: मगर येत असल्याचं पाहून येथील रहिवासी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरतं. त्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झालं असून या मगरींना रेस्क्यू केलं जातं.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील प्राण्यांचे काही व्हिडिओ अंगावर शहारे आणणारे असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक कल्पनेच्या पलीकडचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून रस्त्याने चालताना तुम्हीही 10 वेळा विचार कराल.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका रस्त्याला मध्यभागी खड्डा पडला आहे. या खड्ड्यातून एका मगरीने डोकं वर काढलंय. मगर वरती येत असल्याचं पाहून येथील रहिवासी नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. त्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झालं असून या मगरींना रेस्क्यू केलं जातं.

दोन व्यक्ती रस्त्याच्या आतमध्ये फसलेल्या मगरींना रस्क्यू करत आहेत. यावेळी त्यांनी सुरुवातीला मगरींच्या तोंडाजवळ एका लाकडी काठी आणि दोरीच्या साहाय्याने गाठ मारली आहे. सुरवातीला यातून एक मगर बाहेर पडते. त्यानंतर आतमध्ये आणखी काही मगरी लपलेल्या दिसतात. एक एक करून या सर्व मगरी बाहेर काढल्या जातात.

व्हिडिओ पाहून घटनेमागील थरार किती असावा हे जाणवत आहे. @tyrese या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत. मगर या उभयचर प्राणी आहेत. त्या पाण्यात आणि जमिनीवर देखील राहू शकतात. मगरी प्राण्यांसह माणसांनाही आपलं भक्ष बनवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT